पुण्यात सोमवारपासून Unlock, काय सुरु, काय बंद? वाचा नव्या गाईडलाईन्स
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे.
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध (Pune Unlock) सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गाईडलाईन्स जारी (Pune Unlock Guidelines) केल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर लग्न सभारंभासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे, तर व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, कोचिंग क्लासेस आदी गोष्टी अटीशर्थींसह सुरु करण्यात येणार आहेत. (Unlock from Monday in Pune, Relaxation from corona restrictions)
पुण्याच्या शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने त्याठिकाणी सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तर पुण्यातील पीएमपी बससेवाही आजपासून 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. सार्वजनिक बस वाहतूक सुरु झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सोमवारपासून पुण्यात काय सुरु?
- दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील.
- बसमध्ये 100 टक्के आसन क्षमतेने प्रवास, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई
- मॉल, अभ्यासिका, ग्रंथालये 50 टक्के क्षमतेने सुरू
- हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत टक्के क्षमतेने सुरू
- हॉटेलमधील पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहणार
- सार्वजनिक मैदाने पहाटे 5 ते सकाळी 9 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार.
- लग्न समारंभास जास्तीत जास्त 50 लोकांना परवानगी
- अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींनाच परवानगी
- सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यास परवानगी
- जिम, सलून, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार
- शहरात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी
- रात्री 10 नंतर संचारबंदी
- मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार
कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी (Break the chain) सोमवार दि. १४ जून २०२१ पासून सुरू होत असलेल्या नव्या नियमावलीचे दि. ११ जून २०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश. pic.twitter.com/NoE8KNpuHS
— PMC Care (@PMCPune) June 11, 2021
अजित पवार काय म्हणाले?
पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथील करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय लागू केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुपारी दिली होती. कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल. मात्र पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण क्षेत्रात मात्र यापुर्वीचेच निर्बंध कायम राहतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.
ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे
कोरोना रोखण्यासाठी विविध स्तरावर उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारणीवर भर देण्याचे निर्देशही अजित पवार यांनी यंत्रणेला दिले.
संबंधित बातम्या
ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण
सोमवारपासून पुणे शहरातील निर्बंध शिथिल करणार, पण लक्षात ठेवा…; अजितदादांनी बजावले
(Unlock from Monday in Pune, Relaxation from corona restrictions)