राज्यात कुठे बसला गारपीटचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळेही मोठे नुकसान, पाहा Video
हवामान विभागच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत गारपीट झाली आहे. अहमदनगरला नेवासा , शेवगाव आणि पारनेर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांच मोठ नुकसान झालय. मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट झाली आहे.
पुणे : मार्च महिना पावसाचा महिना झाला होता. आता एप्रिल (April) महिन्यातही अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) महाराष्ट्रातील काही भागांत थैमान घातलंय. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात विजांच्या कडकटासह पावसाच्या सरी कोसळल्या. तर काही भागाला गारपीटीचा सामना करावा लागला. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु झाला. तो दुसरा व तिसऱ्या आठवड्यातही कायम होता. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
अहमदनगरला नेवासा , शेवगाव आणि पारनेर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांच मोठ नुकसान झालय. नेवासा तालुक्यातील भेंडा , कुकाणा येथे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून गेले तर जनावरेही दगावली आहेत.रस्ते, शेतशिवारातील झाडे देखील उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी काढणीला आलेला कांदा गारपिटीमुळे वाया गेला आहे. तर नगर तालुक्यातील संत्रा बागेचे मोठे नुकसान झाला असून संत्रा अक्षरशा गळून गेल्या आहे. संपूर्ण शेतामध्ये संत्र्याचा सडा पाहायला मिळतो.
अहमदनगरला शेवगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भातकुडगावसह भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, गुंफा परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा, गहू, फळबागांचे मोठे नुकसान झालय. तर अनेक ठिकाणी घराची छत उडून गेले आहे.
नगर … pic.twitter.com/jpIzJ04wa6
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 8, 2023
धारशिवमध्ये अवकाळी
धाराशिव जिल्ह्यातील वाडी बामणी या गावात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. गारपीट होऊन जवळपास 18 तास झाले तरी शेतात गारांचा खच तसाच आहे. टरबूज, आंबा, ड्रॉगन फ्रुटसह ऊस, ज्वारी हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्याप एकही प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी शेतकऱ्याची विचारपूस करण्यासाठी आला नाही.
का पडतोय पाऊस?
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मार्च महिन्यात पाऊस होत असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेच उत्तर-पश्चिमेकडे पाऊस होत आहे. एप्रिल महिन्यात हिच परिस्थिती आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत चार वेस्टर्न डिस्टर्बन्सने उत्तर पश्चिम भारतातील मैदानी परिसरांना प्रभावित केलं आहे. हा अवकाळी पाऊस शेतीसाठीही फायदेशीर नाही आणि आरोग्यासाठीही नाही.
ला- नीनाचा प्रभाव
देशात पावसासाठी ला नीना ही स्थिती चांगली आहे. जून ते ऑगस्ट पर्यंत ला नीना सकारत्मक आहे. मात्र मान्सूनचा अंदाज इतक्या लवकर देणे कठीण असल्याचे डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. हा अंदाज आम्ही 15 एप्रिल रोजी जाहीर करणार आहोत.