राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, पुढचे 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजनुसार राज्यातल्या अनेक शहरांत, ग्रामीण भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. | Unseasonal Rains

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, पुढचे 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यंत अवकाळी पाऊस
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 9:16 AM

पुणे : एकीकडे कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजनुसार राज्यातल्या अनेक शहरांत, ग्रामीण भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देशात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. (Weather Alert Unseasonal Rains In maharashtra Winds And Rains Next two or three Day)

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, गारपीट होण्याचाही हवामान विभागाच अंदाज

कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता कर्नाटक किनारपट्टी ते गोव्यामार्गे आता मध्य महाराष्ट्रापर्यंत आले आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कुठे कुठे वरुणराजाची हजेरी?

अमरावतीत मुसळधार

जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचं मोठे नुकसान झाले आहे. यात चिखलदरा तालुक्याला गारपीटीने अक्षरशः झोपडून काढले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह रात्री पासून पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या गहू पिकाला मोठा फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय.

पुण्याच्या मावळमध्ये अवकाळीची हजेरी

मावळ तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.तसंच काही ठिकाणी गारपीटही झाली. मावळ तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जातो, त्यात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या पावसाचा पर्यटकांनी आनंद घेतला. गेली अनेक दिवस नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत, या पावसाने मात्र ते सुखावले आहेत.

कोल्हापुरात मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. गडहिंग्लज, नेसरी भागात तुफान पाऊस पडला. शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसला. तर अनेक गावातल्या आठवडी बाजारांवर पावसाचा परिणाम झाला.मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाल्याचं चित्र होतं.

पंढरपुरात अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाचे नुकसान

रविवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर शहर आणि तालुक्याममध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली असून द्राक्ष बागाचे मोठे नुकसान झाले आहे. ढगांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागायत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाउनच्या भीतीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल भाव येत आहे अशातच अवकाळी पावसामुळे तालुक्यातील टाकळी, कासेगाव, वाखरी भागातील काढणीला आलेल्या द्राक्ष बागाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आता नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागणार आहे.

बारामतीत जोरदार पावसाची हजेरी

बारामती शहर आणि परिसरात पावसाने रविवारी 4 च्या सुमारास जोरदार हजेरी लावली. शहर आणि तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस पडला. उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना थोडासा गारवा मिळाला.

अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत अनेक ठिकाणी गारा

अहमदनगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाऊस बरसला. तसंच जिल्ह्यातील ग्रामीण भागांत मुसळधार गारांचा पाऊस झाल्याने पिकांचं नुकसान झालं. सिन्नर तालुक्यातील माळवाडी परिसरात तुफान पाऊस झाला. या पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालं.

(Weather Alert Unseasonal Rains In maharashtra Winds And Rains Next two or three Day)

हे ही वाचा :

नितीन राऊत अॅक्शन मोडमध्ये, नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यासाठी दहा सूचना

शिवाजी पार्कची रोषणाई जनतेच्या पैशातून का? महिन्याच्या ‘कलेक्शन’मधून करा, मनसेचा टोला

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.