पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागांत अवकाळी

राज्यातील अनेक भागांत कडाक्याची थंडी (cold wave) पडली आहे. वातावरणातील या बदलानंतर (Change Weather) गुरुवारी व शुक्रवारी राज्यातील अनेक भागांत पाऊस झाला.

पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागांत अवकाळी
अवकाळी पाऊस (फाईल फोटो) Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 9:34 AM

शिरुर, पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. राज्यातील अनेक भागांत कडाक्याची थंडी (cold wave) पडली आहे. वातावरणातील या बदलानंतर (Change Weather) गुरुवारी व शुक्रवारी राज्यातील अनेक भागांत पाऊस झाला.काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस (Rain) झाला. अवकाळी झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारी मध्यरात्री अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने मात्र बळीराजाची चिंता वाढलीय. या अवकाळी पावसाने पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच पिकांना फटकाही बसणार आहे. उत्पादनात घट होणार आहे.

अवकाळीमुळे कांदा, हरभरा, मका, गहू पिकांवर परिणाम होणार आहे. धुके आणि अवकाळीमुळे गहू पिकावर तांबेरा रोग पडण्याची भीती आहे तर हरभरा पिकावर घाट आळी येण्याची शक्यता असते. कांदा आणि मका पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू शकतो.

हे सुद्धा वाचा

बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर आता अनेक भागात अवकाळी पाऊस झाला.  शुक्रवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र दाट धूक्याची चादर बघायला मिळत आहे.  या धुक्यामुळे रब्बी पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.

शेतकऱ्यांना बसणार फटका

कडाक्याची पडलेली थंडी अन् त्यानंतर येणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतीकरी वर्ग धास्तावला आहे, विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांचा गहू व हरभरा पिकांचे नुकसान होणार आहे. पावसाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी त्याद्दष्टिने नियोजन करण्याची गरज आहे. अचानक हा बदल नेमका कशामुळे झाला असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाचा अंदाज

अनुभव मुंबईकरांसह राज्याने घेतला. नाशिक व खान्देशात हाडे गोठवणारी थंडी देखील अनुभवयाला मिळाली. आता गेल्या दोन दिवसांत राज्यातील हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. २७ व २८ जानेवारी रोजी राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD)व्यक्त केले.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.