Pune Crime | विनाकारणाच्या टेलिमार्केटिंग कॉलचा कंपनीला फटका ; भरपाई म्हणून द्यावे लागले इतके लाख

तक्रारीची दाखल घेत पुणे जिल्हा तक्रार निवारण आयोगाने टाटा टेलि सर्व्हिसेस लिमिटेडला  दणका दिला आहे. भरपाई म्हणून दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. गुणवत्ताहीन व नेटवर्क कनेक्शन नसल्याचा त्रास भोगावा लागल्याबद्दल तक्रारदाराला कंपनीने पाच लाख रुपये द्यावेत.

Pune Crime | विनाकारणाच्या टेलिमार्केटिंग कॉलचा कंपनीला फटका  ; भरपाई म्हणून द्यावे लागले  इतके लाख
telemarketing calls
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 10:09 AM

पुणे – विनाकारण मोबाईलवर सतत जाहिरातीसाठी आणि माहिती सांगण्यासाठी येणाऱ्या टेलिमार्केटिंगच्या कॉलमुळे अनेकदा वैताग येतो. अशाच प्रकारच्या कॉलला वैतागून एकाने पुणे जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडे (Pune District Grievance Redressal Commission) टाटा टेलि सर्व्हिसेस लिमिटेडची (Tata Tele Services Limited)तक्रार दिली. या प्रकारच्या कॉलमुळे शारीरिक व मानसिक त्रास झाल्याची नोंद या तक्रारीत करण्यात आली.

आयोगाने घेतली दखल तक्रारीची दाखल घेत पुणे जिल्हा तक्रार निवारण आयोगाने टाटा टेलि सर्व्हिसेस लिमिटेडला  दणका दिला आहे. भरपाई म्हणून दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. गुणवत्ताहीन व नेटवर्क कनेक्शन नसल्याचा त्रास भोगावा लागल्याबद्दल तक्रारदाराला कंपनीने पाच लाख रुपये द्यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितिजा कुलकर्णी आणि संगीता यादव देशमुख यांनी हा निकाल दिला आहे. कंपनीने तक्रारदाराला केसच्या खर्चाची 30 हजार रुपये रक्कम तसेच एकूण रकमेवर प्रत्येक वर्षी 9  टक्के व्याजदराप्रमाणे होणारी रक्कम सहा आठवड्याच्या आत द्यावी, असेही म्हटले आहे.

काय होती तक्रार

व्यवसायाने वकील असलेल्या सिद्धार्थशंकर अमरनाथ शर्मा यांनी टाटा टेलिसर्व्हिसेस, नवी दिल्ली आणि बंडगार्डन रस्त्यावरील कंपनीच्या शाखेविरुद्ध तक्रार दाखल केली होती.या तक्रारीत त्यांनीसांगितले आहे की शर्मा 2012  ते2016  दरम्यान टाटा डोकोमोचे ग्राहक होते. त्यांनी ‘डू नॉट डिस्टर्ब’ च्या सुविधेसाठी नोंदणी केली होती. मात्र टेलिमार्केटिंगचे कॉल्स त्यांना सुरू झाले. सातत्याने आग्रह करून प्रिपेड सिमकार्ड पोस्टपेडमध्ये बदलण्यास भाग पाडण्यात आले. ते कॉल्स रेकॉर्ड करून शर्मा यांनी त्याची माहिती कंपनीला पाठविली. कंपनीने त्याची दखल घेऊन नको असलेले टेलिमार्केटिंगचे कॉल्स तात्पुरते थांबविले. पण पुन्हा कंपनीच्या एजंटांचे खासगी मोबाईल क्रमांकावरून त्यांना कॉल्स सुरू झाले. मोबाईलवर मिस कॉल्ड पडल्यानंतर त्या कॉल्सवर फोन केला असता, त्यांना कॉल शुल्क आकारण्यात आले. कंपनीने ट्रायच्या नियमांचा भंग केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदाराने टेलिमार्केटिंग सुविधांबाबत चुकीचे मतप्रदर्शन केल्यामुळे कंपनीने त्यांचे सिमकार्ड निष्क्रिय केल.

Video | Beed मध्ये आठवडी बाजार बंद केला म्हणून भाजीवाले संतप्त

Tilkut Chauth 2022: तिळकुट चौथला चुकूनही हे काम केल्यास महागात पडणार , जाणून घ्या याबद्दल सविस्तर!

IND vs SA : धवन-विराट बाद झाल्यावर आमचा डाव गडगडला, कप्तान राहुलकडून पराभवाचं खापर मधल्या फळीवर

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.