Pune Corona | रेल्वे प्रवासासाठी लसीकरण आवश्यक, पण पुण्यात विचारतो कोण?
रेल्वेच्या प्रवासात अनेक प्रवासी हे कोरोना नियमांचे उल्लंघन करून प्रवास करताना पाहायला मिळातात. अनेकजण मास्क न घालताच प्रवास करतात. तर अनेक फेरीवालेही , भिकारीही मोठ्या प्रमाणात मास्क न घालता प्रवास करतं आढळून आले आहेत.

पुणे – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे निर्बंध कडक केले आहेत. शहरातील सिनेमागृह , मॉल या यासारख्या ठिकाणीतर लसीकरणाचे दोन्ही डोसपूर्ण झाल्यांशिवाय प्रवेश दिला जात नाही. सिनेमागृह , मॉल या ठिकाणी लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले आहेत का नाही हे पाहण्यासाठी यंत्रणा कार्यरत असलेली दिसून येते. शहरातील रेल्वे स्थानकावर तसेच रेल्वेत प्रवाश्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, की नाही हे पाहण्यासाठी कुठलीही यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसून आले आहे. केवळ तिकीट खिडीकच्या ठिकाणी कधीतरी युनिव्हर्सल पासची विचारणा केली जाते. याच्याशिवाय लसीकरणाबद्दल कोणत्याही प्रकारची विचारणा रेल्वे स्थानकावर होताना दिसत नाही.
रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासन गाफील
राज्यासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे शहारातील रेल्वे स्थानकांवर देशाच्या विविध भागातून लोक येतात. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात प्रवासी येत राहतात . राज्य सरकारच्या सूचनेनुसार रेल्वे प्रशासनाने केवळ रेल्वेच्या लोकल व डेमू प्रवासावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे त्याच लोकांना लसीकरणाबाबात विचारणा होताना दिसून येत आहे. दुसरीकडं अन्य एक्स्प्रेस व अन्य गाडयांना विचारणा होत नाही. इतकचं नव्हेत तर अनेकदा रेल्वे स्थनाकावर तिकीटाची खरेदी करताना ही लसीचे डोस झाले आहेत का अशी विचारणाही केली जात नाही.
रेल्वेत अनाधिकृत फेरीवाले, भिकाऱ्यांचा वावर रेल्वेच्या प्रवासात अनेक प्रवासी हे कोरोना नियमांचे उल्लंघन करून प्रवास करताना पाहायला मिळातात. अनेकजण मास्क न घालताच प्रवास करतात. तर अनेक फेरीवालेही , भिकारीही मोठ्या प्रमाणात मास्क न घालता प्रवास करतं आढळून आले आहेत. यासगळ्यात यांना विचार कोण सांगणार? विचार कोण ,, अन करा वाई करणारा कोण असा प्रश्न निर्माण होतो.
सद्यस्थितीला सुरु असलेल्या रेल्वेगाड्या पुणे- सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस , पुणे – मुंबई डेक्कन डेक्कन क्वीन एक्स्प्रेस सिहगड एक्स्प्रेस पुणे -नागपूर , पुणे दानापूर पुणे झेलम एक्स्प्रेस पुणे – हटिया पुणे – एर्नाकुलम
Punjab | काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का! हरजोत कमलनंतर काँग्रेसचे आणखी 5 ज्येष्ठ नेते भाजपात दाखल
ओबीसी विषयावर सरकार फक्त खोटं बोलतं, चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल