दुःखद घटना| वैशाली आणि रुपाली हॉटेलचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचे निधन; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली
कर्नाटकातील ओणिमजालू नावाच्या खेड्यात ८ ऑक्टोबर १९३२ साली जन्मलेले जगन्नाथ शेट्टी आपल्या काकासोबत वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कर्नाटक सोडून कल्याण येथे आले. तिथे त्यांनी ३ रुपये पगारावर नोकरी सुरु केली. पुढे वयाच्या १७ व्य वर्षी ते पुण्यात आले वैशाली आणि रुपाली हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
पुणे – पुण्याच्या खाद्य संस्कृतीत महत्त्वाची ओळखअसलेल्या प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रुपालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचे वयाच्या ९१ वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. डेक्कन परिसरतील प्रयाग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातवंड असा परिवार आहे.
असा उभा केलं रुपाली हॉटेल
कर्नाटकातील ओणिमजालू नावाच्या खेड्यात ८ ऑक्टोबर १९३२ साली जन्मलेले जगन्नाथ शेट्टी आपल्या काकासोबत वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कर्नाटक सोडून कल्याण येथे आले. तिथे त्यांनी ३ रुपये पगारावर नोकरी सुरु केली. पुढे वयाच्या १७ व्य वर्षी ते पुण्यात आले वैशाली आणि रुपाली हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीपासून अगदी मन लावून काम करत होते. हॉटेलमध्ये सातत्याने राबत असत. पुढे काम करत असलेल्या वैशाली आणि रुपाली हॉटेलचे मालक झाले. रुपाली हॉटेल नावारुपाला आणण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावली आहे. अत्यंत कष्टाने उभं केलेलं हॉटेल पुरस्कारांनी हॉटेल वैशालीला गौरविण्यात आलं आहे. तसंच अनेक सेलिब्रिटी, राजकारणी यांचं हॉटेल वैशाली आवडीचं ठिकाण बनलं आहे. आजही हॉटेल वैशालीमध्ये पोटभर जेवणासाठी ग्राहक रांगा लावून उभे असतात.
सामाजिक बांधिलकी जपणारा हॉटेल व्यावसायिक – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, हॉटेल ‘वैशाली’चे मालक जगन्नाथ शेट्टी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं असून सचोटीने व्यवसाय करत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श हॉटेल व्यावसायिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, गेली अनेक दशकं पुण्यातील हॉटेल वैशाली, रुपाली आणि आम्रपालीच्या माध्यमातून जगन्नाथ शेट्टी यांनी पुणेकरांच्या हृदयात स्वतंत्र स्थान निर्माण केलं. सचोटीने व्यवसाय करत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत मोलाची भर टाकली. त्यांची हॉटेल ही पुण्याच्या राजकीय, सामजिक, सांस्कृतिक चळवळींची केंद्र राहिली आहेत. सचोटीने व्यवसाय करतानाच सामाजिक भान जपत जगन्नाथ शेट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांना सढळ हाताने मदत केली. पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीतील ते अनेक महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीतलं तसेच पुणेकरांच्या मनातलं जगन्नाथ शेट्टी यांचे स्थान कायम राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शिवभोजन केंद्राचं अनुदान 5 महिन्यांपासून अडकलं; ठाकरे सरकारची महत्त्वाची योजना बंद पडण्याच्या दिशेनं
Mumbai | चेंबूरमध्ये स्नो-फॉल? छे… हा तर पावडर-फॉल्ट! काय आहे नेमकं प्रकरण?
रस्त्याची तुलना हेमा मालिनींच्या गालांशी; गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची दरेकरांची मागणी