Vande Bharat : पुणेकरांना मिळणार नव्या वंदे भारतची भेट, कोणत्या मार्गावर सुरु होणार गाडी
vande bharat express : मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला चांगले यश मिळाले. या यशानंतर आता सरळ पुणे रेल्वे स्टेशनवरुन वंदे भारत ट्रेन सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे दोन राज्य वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले जाणार आहे.
पुणे : भारतीय रेल्वेचा विकास वेगाने आहे. वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या ट्रेनचे नेटवर्क वाढत आहे. पुणेकरांसाठी मुंबई ते सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. परंतु ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुणे रेल्वे स्टेशनवरुन सरळ कोणत्याही शहरात जात नाही. परंतु आता ही अडचण दूर होणार आहे. लवकरच पुणे शहरातून थेट वंदे भारत ट्रेन सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे लवकरच पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेसने थेट दुसऱ्या राज्यापर्यंत जाणार आहे.
कुठे सुरु होणार
तिरुपती ते हैदराबाद अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. यापूर्वी वंदे भारत एक्स्प्रेस सिकंदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यान चालवली जात होती. आता पुणे ते सिकंदराबाद अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यात येणार आहे. सध्या पुणे ते सिंकदराबाद शताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरु आहे. या गाडीला सिकंदराबाद ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस करण्यात येणार आहे. शताब्दी एक्स्प्रेस सिकंदराबाद ते पुणे प्रवास 8.25 तासांत पूर्ण करते.
सिकंदराबाद-नागपूर
सिकंदराबादवरुन नागपूरसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यात येणार आहे. या गाडीला काजीपेट, रामागुंडम, मनचेरियल, सिरपूर कागजनगर आणि बलारशाह या ठिकाणी थांबा देण्याचा विचार आहे. बेंगळूरु, पुणे, नागपूर मार्गावर वंदे भारत सुरु करण्याचा योजनेमुळे सिंकदराबाद-नागपूर गाडी सुरु होणार आहे.
काय आहेत वंदे भारतमध्ये सुविधा
- या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
- जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
- लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
- मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
- अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
- मुंबईहून सोलापूरला ही ट्रेन केवळ साडेसहा तासात पोहोचते
- या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार अशा दोन प्रकारच्या बोगी
मेक इन इंडिया ट्रेन
देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे.