पुण्यात संतापलेल्या वसंत मोरे यांनी स्वत: चालवला हातोडा, सोशल मीडियावर पोस्ट करत दिला गंभीर इशारा

Pune Vasant More: कात्रजमधील मांगडेवाडी भागातील एका गोठ्यात शनिवारी गाईची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची माहिती वसंत मोरे यांना मिळाली. त्यानंतर वसंत मोरे आणि त्यांचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्या गोठ्यावर हातोडा चालवला.

पुण्यात संतापलेल्या वसंत मोरे यांनी स्वत: चालवला हातोडा, सोशल मीडियावर पोस्ट करत दिला गंभीर इशारा
वसंत मोरे यांनी अनधिकृत बांधकाम तोडले.
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 12:27 PM

पुण्यातील डॅशिंग, आक्रमक नेते अशी ओळख असलेले पुणेकरांचे तात्या अर्थात वसंत मोरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते असलेले वसंत मोरे यांनी पुण्यात घडलेल्या गंभीर विषयाला हात घातला आहे. सोशल मीडियाच्या आधार घेत या विषयाला वाचा फोडली. स्वत: हातोडा हातात घेऊन कारवाई केली आहे. पुण्यातील कात्रज भागात एका गाईची हत्या झाली होती. त्यामुळे संतापलेल्या वसंत मोरे यांनी स्वत: त्या व्यक्तीच्या गोठ्यातील काही अनिधिकृत बांधकाम तोडले आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

गोठ्यावर हातोडा चालवला

कात्रजमधील मांगडेवाडी भागातील एका गोठ्यात शनिवारी गाईची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची माहिती वसंत मोरे यांना मिळाली. त्यानंतर वसंत मोरे आणि त्यांचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्या गोठ्यावर हातोडा चालवला. तसेच या व्यक्तीच्या मागे आणखी कोण, कोण आहेत? त्याचा शोध घ्यावा, पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

दोन, तीन लोकांना अटक

सोशल मीडियावर बोलताना वसंत मोरे म्हणाले, या प्रकारचा आम्ही निषेध करत आहोत. गाईच्या हत्येची तक्रार पोलिसांकडे गेली. त्यानंतर दोन, तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. गाईची हत्या करणार व्यक्ती हिंदू धर्मातील असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला. त्या ठिकाणी आता पुणे मनपाने कारवाई करावी. या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली पाहिजे. आरोपींना जामीन होऊ देऊ नये. कात्रज भागात असा प्रकार पुन्हा होऊ देऊ नये. अन्यथा, आम्ही परिणामांची पर्वा न करता कारवाई करु, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी अहवाल द्यावा

गोठ्याचे बांधकाम अवैध आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्याने रिपोर्ट द्यावा, असे वसंत मोरे यांनी पोलिसांना दूरध्वनीवरुन सांगितले. हा व्यक्ती दुसऱ्यांदा असाच गुन्हा करताना सापडला आहे. त्याचे हे प्रकार वाढत आहेत. बऱ्याच वर्षांपासून त्याचा हा उद्योग सुरु आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या गाई तो येथे आणून त्याची हत्या करतो. माझ्या परिसरात असे विषय चालू देणार नाही. यापुढे असे प्रकार झाल्यास काय होईल? ते मी आता सांगू शकत नाही. तसेच त्या व्यक्तीच्या मागे कोण, कोण आहेत? त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....