Vasant More MNS : वसंत मोरेंची राजकीय हत्या का केली? एकेकाळच्या मनसे नेत्या रुपाली पाटलांचा सवाल
सुरूवातील वसंत मोरे Mns Vasant More) यांनी या निर्णयावर आपली नाराजी उघड बोलून दाखवली. त्यानंतर नाराज वसंत मोरे यांना घरचा रस्ता दाखवत अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या गळ्यात पुणे मनसेच्या अध्यक्षपादाची माळ टाकण्यात आली.
पुणे : पुण्याच्या राजकारणाचा पारा दुपारच्या उन्हाच्या पाऱ्यापेक्षाही जास्त चढला आहे. कारण मशीदीवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका आणि पुण्यात सुरू झालेला वाद आता चांगलाच वाढला आहे. सुरूवातील वसंत मोरे Mns Vasant More) यांनी या निर्णयावर आपली नाराजी उघड बोलून दाखवली. त्यानंतर नाराज वसंत मोरे यांना घरचा रस्ता दाखवत अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या गळ्यात पुणे मनसेच्या अध्यक्षपादाची माळ टाकण्यात आली. राज ठाकरे यांच्याशी काही बोलणं झालं नाही, अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी वसंत मोरे यांनी दिली. तसेच मी अजूनही मनसेतच राहण्यावर ठाम आहे, असेही वसंत मोरे म्हणाले. मात्र मनसेच्या या निर्णयावरून पुण्यातल्या वसंत मोरे यांच्या माजी सहकारी आणि राष्ट्रवादी नेत्या रुपातील पाटील यांनी मनसेला खोचक सवाल केला आहे.
वसंत मोरेंची राजकीय हत्या?
वसंत मोरेंची राजकीय हत्या केली का ? असा थेट सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे. रुपाली पाटील यांनी या निर्णयावर टीका करताना रुपाली पाटील म्हणाल्या, वसंत मोरे यांनी पाडव्यानंतर जी भूमिका घेतली ती आपण पाहिली आहे. आपण वसंत मोरेंचं काम आपण पाहिलं आहे, ते खूप चांगलं काम करतात. त्यांना सर्व जातीपातीची लोक मतदान करतात. आज ज्या पद्धतीने ही खांदेपालट झाली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र साईनाथ बाबर यांच्या प्रभागातही मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहे, त्यामुळे ही कुठली खेळी आहे हे कळत नाही असेही त्या म्हणाल्या आहेत. मनसेत हेच चालतं असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मनसे नेत्यांची नेहमीची खेळी
ही मनसेच्या अंतर्गत खेळी आहे. वसंत मोरे यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. मात्र अशाच मनसेच्या खेळींना वैतागून मी मनसे सोडली. त्यावेळी मला ते म्हणाले होते की ही राजकीय आत्महत्या आहे. मग आज वसंत मोरेंची राजकीय हत्या केली का? असा सवाल त्यांनी केला आहे. वसंत मोरे राष्ट्रवादीत आले तर त्याचं स्वागत आहे. आमचे शहराध्यक्ष यांनीही याबाबत त्यांचं राष्ट्रवादीत स्वागत केलं आहे, कधी कधी निर्णय घ्यावा लागतो. लोकप्रतीनीधींमध्ये निर्णय क्षमता असावी लागते. कालच वसंत मोरे यांनी निर्णय घेतला असता, तर आज ही वेळ आली नाही.
Vasant More | वसंत मोरेंना पुणे शहर प्रमुखपदावरुन हटवलं, राज ठाकरेंचं पत्र जसंच्या तसं