Video: वडाच्या झाडात बिबट्या अडकला, सुटकेसाठी बिबट्याची धडपड, नागरिकांची गर्दी
Video: झाडाच्या जाळवंडात बिबट्या अडकला, पाहा व्हिडीओत सुटकेसाठी बिबट्याची धडपड

पुणे : सोशल मीडियामुळे (Social Media) एखादी घटना पटकन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती (mobile) पाहता येते. त्यामध्ये प्राण्यांचे व्हिडीओ (Animal Video) अधिक लोकांना आवडत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. बिबट्याचे (Leopard) आतापर्यंत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आपण पाहिले आहेत. आतापर्यंत व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बिबटे बिनधास्त, हल्ला करताना, इकडून-तिकडे फिरताना असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील.
जुन्नर तालुक्यातील बेल्हे-गुळूंचवाडी येथील धायटेवस्तीवर असणाऱ्या वडाच्या झाडात बिबट्या अडकला आहे. बिबट्या रात्रीच्या सुमारास अडकला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ज्यावेळी बिबट्या अडकला असल्याची माहिती लोकांना समजली, तेव्हापासून बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.



काही जागृत लोकांनी ही माहिती तात्काळ वनखात्याला दिली आहे. माहिती मिळताचं बेल्हे वनपरिक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे माणिकडोह येथील रेस्क्यू टीमला सुध्दा पाचारण करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असताना झाडात अडकला असल्याचा अंदाज रेस्क्यू टीमने व्यक्त केला आहे. बिबट्याला भूल देवून रेस्क्यू करण्यात येणार आहे
सध्या घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली असून अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याची धडपड कैद करीत आहेत.