हू इज अनिल बोंडे? लायकीत राहा, शिंदे गटाच्या नेत्याने सुनावले; मुख्यमंत्र्यांवरील ‘ती’ टीका जिव्हारी

| Updated on: Jun 15, 2023 | 12:03 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. या टीकेवरून माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अनिल बोंडे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच बोंडे यांना लायकीत राहण्याचा सल्लाही दिला आहे.

हू इज अनिल बोंडे? लायकीत राहा, शिंदे गटाच्या नेत्याने सुनावले; मुख्यमंत्र्यांवरील ती टीका जिव्हारी
vijay shivtare
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. बोंडे यांच्या टीकेनंतर आता त्यांना लायकीत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही अनिल बोंडे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. हू इज अनिल बोंडे? असा सवालच विजय शिवतारे यांनी केला आहे. तसेच बोंडे यांनी लायकीत राहावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

अनिल बोंडे यांची उंची किती आहे? अनिल बोंडे असं बोलले असीतल आणि एकनाथ भाई शिंदे यांना रेफर करून बोलले असतील तर चुकीचं आहे. अनिल बोंडे आणि मी मंत्री होतो. तेव्हा तेही मंत्री होते. त्यांची इमेज आणि बुद्धी काय हे मला माहीत आहे. त्यांनी असं विधान केलं असेल तर दुर्देवी आहे. कुणी टीका करावी याला महत्त्व असतं. कुणी उठसूट टीका करेल तर त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. टीका तेवढ्या ताकदीच्या माणसाने केली असेल तर उत्तर दिलं पाहिजे. समज गैरसमज दूर केले पाहिजे, असं विजय शिवतारे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

त्या विधानाचा निषेध

परंतु, निव्वळ भाजपमध्ये मी कसा असा बोललो? मी फडणवीस यांच्या किती जवळ आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आणि स्वार्थासाठी अशा प्रकारची बेजबाबदार विधान करणे हे चुकीचं आहे. त्यांच्या विधानाला काय महत्त्व द्यायचं? बोंडेंना विचारून युतीचं काही होणार आहे? हू इज बोंडे? भाईंच्या बाबतीत असं बोललं असेल तर मी त्यांचा निषेध करतो. त्यांनी लायकीत राहावं, असं शिवतारे म्हणाले.

बोंडे काय म्हणाले?

अनिल बोंडे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नसतो, असं सांगतानाच ठाणे म्हणजे मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र वाटतो काय? असा सवाल अनिल बोंडे यांनी केला होता. तसेच देवेंद्र फडणवीस हे सर्वमान्य नेते आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांनी विकासाची प्रचंड कामे केली आहेत, असं बोंडे म्हणाले होते. बोंडे यांची ही टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. बोंडे यांच्या या टीकेचा शंभुराज देसाई, संजय गायकवाड, संजय शिरसाट यांनी समाचार घेतला होता. एवढेच नव्हे तर माजी मंत्री बच्चू कडू यांनीही या मुद्द्यावरून अनिल बोंडे यांना लायकीत राहण्याचा सल्ला दिला होता.