भटक्या समाजासाठी मोदींच्या पाया पडू, बावनकुळेजी घेऊन चला: विजय वडेट्टीवार
ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू. रस्त्यावर उतरू. तरीही आरक्षण नाही मिळालं तर घोंगडी आणि काठी हातात घेऊ. (vijay wadettiwar taunt chandrashekhar bawankule over obc reservation)
सोलापूर: ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू. रस्त्यावर उतरू. तरीही आरक्षण नाही मिळालं तर घोंगडी आणि काठी हातात घेऊ. या भटक्या समाजासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायला तयार आहोत. बावनकुळेजी एकदा आम्हाला त्यांच्याकडे घेऊन चला, अशी सादच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना घातली. (vijay wadettiwar taunt chandrashekhar bawankule over obc reservation)
सोलापुरात आज ओबीसी निर्धार मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. राजकीय शेरेबाजी आणि टोलेबाजीने ही परिषद चांगलीच गाजली. यावेळी वडेट्टीवार यांनी धुवाँधार बॅटिंग केली. राजकीय आरक्षणाचे काय होईल असे विचारतात, मात्र आम्ही काय झोपलोय का?, असा सवाल करतानाच राजकीय आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यायला आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू. त्यांना आरक्षासाठी विनंती करू. अन्यथा रस्त्यांवर उतरू. तरीही आरक्षण मिळालं नाही तर घोंगडी आणि काठी हातात घेऊ. या भटक्या समाजासाठी आम्ही मोदींच्या पाया पडायला तयार आहोत. बावनकुळेजी आम्हाला घेऊन चला. आमच्या समाजासाठी वेगळं काही तरी करा म्हणून आम्ही पंतप्रधानांना विनंती करू, असं वडेट्टीवार म्हणाले.
तर एक लाख लोक आले असते
आजच्या दिवशीच सोलापूरात भटक्या विमुक्तांना मुक्त करण्याचे काम झाले होते. मात्र समाजाच्या दृष्टीकोणाला आजही आम्ही बदलू शकलो नाही. मान-अपमान सगळं सोडून, पक्षीय बंधनं सोडून चंद्रशेखर बावनकुळे इथे उपस्थित राहिले. कोरोनाचे बंधन नसते, तर 1 लाख लोक इथे जमले असते. मंत्री पद काही कायम राहणार नाही. महाराष्ट्रचे नेतृत्व करण्याची क्षमता या समजात आहे. माझी इच्छा आहे हा समाज मागणारा नव्हे तर देणारा व्हावा. इंग्रजांची सत्ता गेली तरी आमच्या समाजाला आजही गुलाम असल्यासारखे वाटते. आमच्यातला कोणी चपराशी झाला तरी दोन बायका करतो. अजूनही आम्हाला घर नाही, जातीचे दाखले मिळत नाहीत, असं सांगतानाच 2008 चा जीआर पुनर्जिवीत करण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवकांना जात कोणती ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
राजकीय टीकेने प्रश्न सुटत नाही
शाळेत गेले नाहीत म्हणून पुरावा नाही, म्हणून दाखले नाहीत. नोकरीत आरक्षण अजून आहे, तेही आम्ही टिकवू. बोलतांना अनेकांनी संयम ठेवला पण पक्षावर टीका करून प्रश्न सुटत नाही, असा टोला त्यांनी ज्येष्ठ नेते नरसय्या आडम आणि साहित्यिक लक्ष्मण मानेंना लगावला. मी माझ्या समाजाचे हक्क मागतो, तर मला संविधानविरोधी म्हटलं जातं. महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख कोण होते? होता जिवा म्हणून वाचला शिवा. 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन महाराजांनी स्वराज्य उभं केलं, असं त्यांनी सांगितलं.
बहुरुप्याचं पोर इन्स्पेक्टर होणार
या पुढे दर महिन्याला एका एका समाजाची बैठक लावणार. प्रत्येक जिल्ह्यात दोन ओबीसी हॉस्टेल उभी करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्याची परवानगी मिळाली आहे. आता भटके विमुक्त समाजातील विद्यार्थी CBSC स्कूलमध्ये जाणार. प्रत्येक विद्यार्थ्यावर आम्ही 70 हजार रुपये खर्च करणार. त्यामुळे बहुरुप्याचा मुलगा खोटा ड्रेस घालून नव्हे तर खरा पोलीस इन्स्पेक्टर होणार, असं ते म्हणाले.
दिल्लीतून झारीतले शुक्राचार्य शोधावे लागतील
यावेळी त्यांनी बावनकुळे यांना टोले लगावले. बावनकुळे यांच्या भाषणाचा रोख केंद्र आणि राज्य सरकारकडे असेल. बावनकुळेंना झारीतला शुक्राचार्य कोण दिसला मी तपासून बघतो. आरक्षण टिकण्यासाठी सर्व पक्षांची जबाबदारी आहे. झारीतले शुक्राचार्य शोधायचे असेल तर दिल्लीपासून शोधावे लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला.
मराठा आरक्षणाला विरोध नाही
आमचा मराठा समाजावर रोख नाही. प्रस्थापितांनी ओबीसीमधून आरक्षण मागू नये ही आमची मागणी आहे. आमच्या आरक्षणात प्रस्थापित जाती आल्या तर इथे कोण टिकणार?, असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही. विरोधही करणार नाही. उलट पाठींबा देऊ. मात्र ओबीसींमधून आरक्षण न मागण्याची हाथ जोडून विनंती करतो, असं ते म्हणाले. (vijay wadettiwar taunt chandrashekhar bawankule over obc reservation)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 August 2021 https://t.co/KwVyAQYqAo #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2021
संबंधित बातम्या:
तुम्ही नादच केलाय थेटsss, ना IIT, ना ‘मोठी’ डीग्री, कोल्हापूरच्या अमृताला 41 लाखांचं पॅकेज!
पवारांच्या बारामतीला मुख्याधिकारी मिळेना! 2 महिन्यांपासून नगर पालिकेच्या कामकाजावर मोठा परिणाम
(vijay wadettiwar taunt chandrashekhar bawankule over obc reservation)