पुण्यात गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमांना हरताळ, कार्यकर्त्यांच्या तुफान गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारीच (25 जून) पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध कायम ठेवले. मात्र, पुणेकरांना नियम सांगणाऱ्या गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्टिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
पुणे : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारीच (25 जून) पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध कायम ठेवले. मात्र, पुणेकरांना नियम सांगणाऱ्या गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्टिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. पुण्यातील रांजणगाव येथे दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असताना गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमांना हरताळ फासला बोललं जातंय (Violation of Corona restriction in program of Home Minister Dilip Walse Patil in Pune).
मागच्याच आठवड्यात पुण्यात राष्ट्रीवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात असाच प्रकार घडला होता. त्यावेळी अजित पवार यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती, तर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 150 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. यासर्वांना अटक करुन जामीनावरही सोडण्यात आलं. ही घटना ताजी असतानाच गृहमंत्री मात्र, कोरोना नियम विसरले की काय असा प्रश्न निर्माण झालाय.
गृहमंत्र्यांना आपण काय बोललो याचा विसर पडला का?
शुक्रवारी खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसून, डेल्टा प्लसचा धोका वाढतोय अस सांगत, नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे असं सांगितलं. मग दोनच दिवसात गृहमंत्र्यांना आपण काय बोललो याचा विसर पडला की हे नियम त्यांच्यासाठी नाहीत, अशी चर्चा आहे.
जे शरद पवारांना जमतं ते वळसे पाटलांना का जमलं नाही?
एकीकडे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या कार्यक्रमात कोरोना नियम फाट्यावर मारले जात आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मात्र गर्दी होऊ नये यासाठी मोठी काळजी घेताना दिसतात. शनिवारी संध्याकाळी शरद पवारांनी पक्षाच्या नव्या कार्यालायला भेट दिली. काही जणांचा पक्ष प्रवेशही यावेळी करण्यात आला. मात्र, यावेळी अजिबात गर्दी होणार नाही याची खबरदारी घेत त्या प्रकारच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होता. गृहमंत्री वळसे पाटीलही तेव्हा सोबत होते, मग जे शरद पवारांना जमतं ते वळसे पाटलांना का जमलं नाही, हा प्रश्न आहे.
पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले होते?
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. कोरोना रुग्णांची सध्याची संख्या पाहता या आठवडयातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहतील, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीदरम्यान केले. pic.twitter.com/anFUc31K0H
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) June 25, 2021
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत शुक्रवारी (25 जून) आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात या आठवड्यातही निर्बंध कायम ठेवले. ते म्हणाले होते, “कोरोना रुग्णांची सध्याची संख्या पाहता या आठवडयातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहतील. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच नियोजन करून पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे.”
हेही वाचा :
पुणेकरांना लॉकडाऊनमधून दिलासा नाही, सोमवारपासून काय सुरु काय बंद?
‘पुण्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात येण्याआधी मी काळजीत होतो’, गर्दीवरुन शरद पवारांची टोलेबाजी
वळसे पाटील आमचेही गृहमंत्री, मग राष्ट्रवादी आमदारपुत्र आणि शिवसैनिकांना वेगळा न्याय का? राऊत कडाडले
व्हिडीओ पाहा :
Violation of Corona restriction in program of Home Minister Dilip Walse Patil in Pune