Baramati water cut : बारामतीकरांनो, पाणी जपून वापरा! वितरण नलिकेच्या कामामुळे गुरुवार, शुक्रवार पाणी नाही!

निरा डावा कालवा पुलावरील वितरण नलिका स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा (Water supply) बंद राहणार आहे. बारामतीकरांची दोन दिवस गैरसोय होणार आहे. यावेळी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

Baramati water cut : बारामतीकरांनो, पाणी जपून वापरा! वितरण नलिकेच्या कामामुळे गुरुवार, शुक्रवार पाणी नाही!
पाणीपुरवठा (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 3:12 PM

बारामती, पुणे : बारामती (Baramati) शहरात गुरुवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. निरा डावा कालवा पुलावरील वितरण नलिका स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे त्यामुळे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा (Water supply) बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. बारामती शहरातील तीन हत्ती चौकात निरा डाव्या कालव्यावर शहराला पाणीपुरवठा करणारी वितरण नलिका आणि दबाव नलिका आहे. येथील पुलाचे (Bridge) सध्या काम सुरू आहे. त्यामुळे वितरण नलिका आणि दबाव नलिकेचे स्थानांतर करणे आवश्यक आहे. गुरुवार आणि शुक्रवारी या नलिका स्थलांतरित करण्याचे काम केले जाणार आहे. नलिका स्थलांतरित करण्याचे काम सुरू असल्यामुळे बारामती शहरातील काही भागात गुरुवारी व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कोणत्या भागात पाणी नाही?

गुरुवार दि. 28 एप्रिल रोजी सिद्धार्थनगर, भीमनगर, चंद्रमणीनगर, विठ्ठलनगर, कोअर हाऊस, वडार सोसायटी, वडकेनगर, सटवाजीनगर आदी संपूर्ण आमराई विभागात पाणीपुरवठा बंद राहील.

‘काटकसरीने वापरा पाणी’

शुक्रवार दि. 29 एप्रिल रोजी विजयनगर, पोस्ट रोड, जवाहरनगर, सिनेमा रोड, महावीर पथ, बुरुड गल्ली, नेवसे रोड, सिद्धेश्वर गल्ली, कसाब गल्ली, सनगर गल्ली, श्रीराम गल्ली या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पुरेसा पाणी साठा करून पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आणखी वाचा :

पुणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणार, पुणे पालिकेचा दावा; मात्र आतापर्यंत नाले अन् पावसाळी गटारांची झालीय अवघी 8 टक्केच स्वच्छता

Pune fire incident : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्याजवळ ट्रक जळून खाक; कागदामुळे भडकली आग

Pune IMD : काहीसं दिलासादायक; एप्रिलमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त थंड पुणे, काय म्हणतोय IMDचा डेटा?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.