PMC Election| पुण्यात रंगली बॅनरबाजी ‘धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत’…. काय आहे नेमका वाद

'जिथे गरज तिथे धीरज' अशा प्रकारचा फ्लेक्स लावला आहे. त्यावरच प्रतिउत्तर म्हणून त्या फ्लेक्सखालीच २ लहान बॅनर लावण्यात आले आहेत. 'धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत, नको बापट - नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख' अशा प्रकारची वाक्ये त्या बॅनरवर लिहिण्यात आली आहेत.

PMC Election| पुण्यात रंगली बॅनरबाजी 'धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत'.... काय आहे नेमका वाद
Pune banner war
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 7:32 PM

पुणे – आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडूना मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. त्यात प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक पक्षाकडून वेगवगेळे तर्क विर्तक लढवले जात आहेत. अनेक ठिकाणी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागांची रचना आणि हद्द यावरून वाद निर्माण झाला आहे. अश्यातच पुण्यात पालिकेच्या निवडणुकीवरून बॅनर युद्ध रंगले आहे. भाजप नगरसेवक धीरज घाटे यांनी प्रभागात लावलेल्या बॅनर खाली विरोधकांनी बॅनर लावले आहे. भाजप नगरसेवक ‘जिथे गरज तिथे धीरज’ अश्या आशयाचे बॅनर घाटे यांनी संपूर्ण प्रभागात लावलेत त्याच बॅनरच्या खाली ‘धीरज आम्हाला नाही तुझी गरज, आता जा घरी परत’ आणि ‘नको बापट, नको टिळक पुणेकरांनाह वी नवी ओळख’ असे बॅनर लावलेत या बॅनरबाजी वरुन पुण्यात निवडणुकी आधीच नव्या वादाला सुरवात

काय आहेत बॅनर नगरसेवक धीरज घाटे यांनी नागरीकांच्या मदतीसाठी ‘जिथे गरज तिथे धीरज’ अशा प्रकारचा फ्लेक्स लावला आहे. त्यावरच प्रतिउत्तर म्हणून त्या फ्लेक्सखालीच २ लहान बॅनर लावण्यात आले आहेत. ‘धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत, नको बापट – नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख’ अशा प्रकारची वाक्ये त्या बॅनरवर लिहिण्यात आली आहेत. त्यामध्ये पुणेकरांना आता नवीन ओळख पाहिजे. असे बॅनर लावण्यात आले आहे. पुढे तुमचाच मतदार बंधू आणि भगिनी असंही लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे हे बॅनर नेमक कुणी लावले आहेत आहे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

प्रभाग रचना जाहीर होताच बॅनर बाजी

पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्यावर अनेक इच्छुक उमेदवारानी आपल्या प्रभात बॅनरबाजी सुरु केली आहे. तर सद्यस्थितीला नगरसेवक असलेल्यानी आपण केलेल्या कामाचा आराखडा मांडणारे बॅनर लावले आहेत. केलेल्या विकासकामाची माहिती देण्यासाठी नगरसेवकांकडून सोशल मेडीयाचाही आधार घेतला जात आहे. त्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया टीमही अनेकांनी नेमली आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात बोगदा खनन कामात महानगरपालिकेची विक्रमी कामगिरी, प्रकल्पाचे किती काम पूर्ण?

Accident | रस्ता सोडून कार शिवारात उलटली! दर्यापूर अंजनगाव रोडवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

मराठवाड्यात विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक मूल्यांकनाला वेग, अपुऱ्या सुविधा असलेल्या कॉलेजची धडधड वाढली

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.