राज्यात इलेक्ट्रीक गाडयांच्या वापराला प्रोत्साहन व प्राधान्य देणार: अजित पवार

Electric Vehicles | गेल्या काही वर्षापासून पिंपरी- चिंचवड एमआयडीसी ऑटो हब म्हणून ओळखली जाते. आता इलेक्ट्रीक वाहनांचे विक्री हब म्हणून नवीन ओळख पिंपरी -चिंचवड शहराला मिळेल. फिटवेल मोबिलीटीच्या माध्यमातून विक्री होणा-या इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडया या सर्व प्रकारच्या प्रदुषणापासून मुक्त असतील.

राज्यात इलेक्ट्रीक गाडयांच्या वापराला प्रोत्साहन व प्राधान्य देणार: अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 2:28 PM

पुणे: राज्यातील वाढते प्रदुषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रीक‍ गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. फिटवेल मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडयांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी- चिंचवड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त राजेश पाटील, फिटवेल मोबिलीटी प्रा. लि.चे रवींद्र कंग्राळकर, चैतन्य शिरोळे, ए. शशांक, श्री. केदार, जगदीश कदम व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काळाची पावलं ओळखून भविष्याचा वेध घेऊन फिटवेल मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेडने इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडयांचे वितरण सेवा सुरु केली आहे. गेल्या काही वर्षापासून पिंपरी- चिंचवड एमआयडीसी ऑटो हब म्हणून ओळखली जाते. आता इलेक्ट्रीक वाहनांचे विक्री हब म्हणून नवीन ओळख पिंपरी -चिंचवड शहराला मिळेल. फिटवेल मोबिलीटीच्या माध्यमातून विक्री होणा-या इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडया या सर्व प्रकारच्या प्रदुषणापासून मुक्त असतील. प्रवासी व मालवाहतूक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण होईल. पेट्रोल, ‍डिझेल, गॅस या इंधनाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर इलेक्ट्रीक मोटारी प्रवासी व मालवाहतूकीसाठी एक चांगला, माफक, स्वच्छ व प्रदुषणमुक्त, फायद्याचा पर्याय आहे.

या पुढच्या काळात इलेक्ट्रीक गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य देण्याचे भूमिका सरकारने घेतली आहे. राज्यातलं वाढतं प्रदुषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेता सरकारने नवीन इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रीक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रीक वाहन खरेदीला प्राधान्य मिळावे यासाठी राज्यातील प्रमुख शहरामध्ये सरकारी व खाजगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे वाढणारे दर त्यामुळे होणारे प्रदुषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रीक वाहने हाच पर्यावरण पुरक असा चांगला पर्याय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फिटवेल मोबिलीटी कंपनी, मॅन-युनायटेड एचआर अँन्ड मार्केटींग कंपनी, चैतन्य सेल्स सर्विसेस कंपनी, इलेक्ट्रीक गाडयांच्या उत्पादन, विक्री, देखभाल-दुरुस्तीच्या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या संबंधीतांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या

31 ऑगस्टपर्यंत स्वस्त बाईक खरेदी करण्याची संधी, केटीएम 250 अ‍ॅडव्हेंचरच्या किंमतीत 25000 रुपये कपात

फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी आणा हिरोची ही आलिशान स्कूटर, 65 किमीच्या मायलेजसह मिळवा ही जबरदस्त ऑफर

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.