पावसाची प्रतिक्षा संपणार, पुढील चार दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट

राज्यात काही भागात पावसाचं जोरदार आगमन झालं होतं. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याचं दिसून आलं. अशातच हवामान खात्याने पावसाची प्रतीक्षा संपणार असल्याचा दावा केला आहे. तर शेकऱ्यांनाही सल्ला दिला आहे.

पावसाची प्रतिक्षा संपणार, पुढील चार दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 4:20 PM

यंदा राज्यभर मान्सूनपूर्व पावसाने राज्यात हजेरी लावलेली पाहायला मिळालं होतं. मात्र पावसाने सर्व ठिकाणी हजेरी लावलेली दिसली नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भ आणि नंदूरबारमध्ये मान्सून अद्याप दाखल झालेला नाही. अशातच पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसराळीकर यांनी पावसबाबत अपडेट दिली असून शेतकऱ्यांनाही कृषी विभागाचा सल्ला घेऊन पेरणी करावी असं आवाहन केलं आहे.

के. एस. होसराळीक काय म्हणाले?

पुढील तीन-चार दिवस विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसहर पाऊस पडतोय. मात्र मान्सून पूर्णपणे राज्यात सर्व दूर दाखल झालेला नाही. नंदुरबार, पूर्व विदर्भात अजून मान्सूनची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचा आवाहन करण्यात आलय. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तसा पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे. तरीही मान्सून सर्वदूर महाराष्ट्रात आणखी पोहोचला नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान, आता खरीप हंगामातील पिकांसाठी पेरणी महत्त्वाची आहे. कारण जर पेरणी केली आणि पावसान दडी मारली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट असणार आहे. त्यामुळे होसाळीकर यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन शेतकऱ्यांना पेरणी करावी असं म्हटलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.