AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : राज्यभरात उन्हाचा तडाखा, जळगावात सर्वाधिक तापमान, वाचा कुठे किती तापमान?

राज्यभरात आज उन्हाचा तडाखा पाहायला मिळाला. फेब्रुवारी महिना सरल्यानंतर आता थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. आज राज्याच्या विविध भागांमध्ये पारा चांगलाच तापला होता.

Weather Update : राज्यभरात उन्हाचा तडाखा, जळगावात सर्वाधिक तापमान, वाचा कुठे किती तापमान?
राज्यात तापमानात वाढ
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 9:16 PM

पुणे : राज्यभरात आज उन्हाचा तडाखा पाहायला मिळाला. फेब्रुवारी महिना सरल्यानंतर आता थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. आज राज्याच्या विविध भागांमध्ये पारा चांगलाच तापला होता. कोकण, विदर्भ, मराठवाडा खानदेशात सूर्यनारायणाने चांगलीच आग ओकली. पुणे हवामान वेधशाळेने कुठे किती तापमान होतं, हे सांगितलं आहे. (Weather Update maharashtra today 04 03 2021 Weather Report)

पाहुयात राज्याच्या कोणत्या भागांत किती तापमान होतं?

जळगाव- 38.5 परभणी- 37.0 सांताक्रुझ मुंबई- 38.1 पुणे- 36.1 औरंगाबाद- 36.6 नाशिक- 36.1 मालेगाव- 38.4 ठाणे-34.8 रत्नागिरी-37.2 जालना- 35.2 सातारा- 35.3 सांगली-36.2 जेऊर-37 बीड-38.3

मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात सूर्यनारायणाने आग ओकली

मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा पाहायला मिळाला. दुपाराच्या सुमारास तर उन्हाचा पारा इतका चढलेला होता की उन्हाचे चटके बसू लागलेले होते. फेब्रुवारी आणि थोडीशी थंडी सरल्यापासून राज्यात आज उन्हाचा कहर पाहायला मिळाला.

यंदा हिवाळ्यातही उष्णता

यंदा थंडी फारशी अनुभवायला मिळाली नाही, असे मुंबईकर म्हणत होते. मात्र ही परिस्थिती केवळ मुंबईतच नव्हती तर देशभरातल्या अनेक ठिकाणी अशी परिस्थिती अनुभवायला मिळाली. यंदाचा हिवाळा सरासरी तापमानाच्या तुलनेत उष्णच होता, असं समोर आलं आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार देशात सरासरी कमाल तापमान 27.47, सरासरी किमान तापमान 15.39 आणि सरासरी उष्ण तापमान 21.43 अंश सेल्सियस होते. हे सर्वसाधारणपणे 26.70, 14.59 आणि 20.65 असे असते.

देशाच्या विविध भागांत हिवाळ्याच्या ऋतुमध्ये तापमानात वाढ

देशभरातील एकूण तापमानाचा विचार केला असता वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व आणि इशान्य भारत आणि दक्षिण द्विकल्प आणि चारही भागांमध्ये हिवाळ्याच्या ऋतुमध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ झालेली पाहायला मिळाली.

हे ही वाचा :

Varsha Gaikwad | दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार : वर्षा गायकवाड.

Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा, हवामान खात्याचा अंदाज; वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.