Weather Update:पुढील 4 दिवस कोकणात अतिवृष्टी, विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, रायगडमध्ये रेड ॲलर्ट
पुणे: महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. आज मान्सून मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये दाखल झाला आहे. पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं दिला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Pune IMD issue alert next four days Heavy rainfall at kokan goa) नैऋत्य […]
पुणे: महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. आज मान्सून मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये दाखल झाला आहे. पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं दिला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Pune IMD issue alert next four days Heavy rainfall at kokan goa)
नैऋत्य मोसमी पावसानं कोकण आणि महाराष्ट्र व्यापला
मान्सूनचा पाऊस शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनच्या पावसानं जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात द्रोणीय क्षेत्र तयार झाल्यानं पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, पुणे जिल्ह्यातही पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यासाठी उद्या रेड अॅलर्ट
भारतीय हवामान विभागानं उद्यासाठी रायगड जिल्ह्यासाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे. तर पुढील चार दिवसांसाठी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
Extremely severe weather warnings issued by IMD for Konkan, Madhya Mah especially for Mumbai Thane Palghar Raigad for today. Mumbai already recd 220.6mm rainfall at 5.30pm since morning.Flooding at few places in city.Mumbai 11-13Jun possibility of 200mm+ RF predicted by IMD. TC pic.twitter.com/StCpbasPJM
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 9, 2021
यंदा वेळे आधीच मान्सूनचे विदर्भात आगमन
विदर्भात 15 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र, हवामान विभागाला हुलकावणी देत, आधीच मान्सून विदर्भात पोहचला. हवामान विभागानं विदर्भात मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलंय. 11 तारखेपासून 13 तारखे पर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. मान्सूनच्या आगमनानं शेतकरी आणि सर्वसामान्य सुखवलाय. सोबतच या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक डॉ. मनमोहन साहू यांनी याविषयी माहिती दिली आहे.
कोकण किनारपट्टीला रेड अॅलर्ट
आज 9 तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार होणार आहे, असं हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली सांगितलं.
संबंधित बातम्या:
Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!
Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर
पहिल्याच पावसात मुंबईची ‘तुंबई’; मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश
(Pune IMD issue alert next four days Heavy rainfall at kokan goa)