Pune PMC : जे काम नेत्यांनी नाही केलं तर अधिकाऱ्यानं केलं? पुणे पालिका हातात येताच प्रशासकाचा अतिक्रमणावर बुलडोजर

शहरातील राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे ठीकठिकाणी अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकामे वाढली आहेत. मात्र याचा नाहक त्रास सर्वसामान्य व पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अतिक्रमणे करून रस्ते अडविणाऱ्यांवर आता दररोज कारवाई होणार आहे

Pune PMC : जे काम नेत्यांनी नाही केलं तर अधिकाऱ्यानं केलं? पुणे पालिका हातात येताच प्रशासकाचा अतिक्रमणावर बुलडोजर
PMCImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 10:53 AM

पुणे – पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation) पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने महापालिकेत प्रशासकाची नेमणूक झाली आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपताच प्रशासक सक्रिय झाले आहेत. शहरात नगरसेवकांच्या (Corporators) आश्रयामुळे ठिकठिकाणी बुरशीसारख्या पसरलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. रस्ते, पदापथावर , गल्ली- बोळात पसरलेली अतिक्रम काढण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. अतिक्रमण काढण्याबरोबरच महानगरपालिका येत्या काळात शहरात वाढलेल्या अनाधिकृत बांधकामावरही (Unauthorized construction)हातोडा चालवणार आहे. शहर अतिक्रमणमुक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे. ठिकठिकाणी उभारण्यात आलेली अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेशही देण्यात आले आहे. अन्यथा तोडण्याचा इशारा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांंनी दिला आहे.

राजकीय वरदहस्तामुळे अतिक्रमणात वाढ

शहरातील राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे ठीकठिकाणी अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकामे वाढली आहेत. मात्र याचा नाहक त्रास सर्वसामान्य व पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अतिक्रमणे करून रस्ते अडविणाऱ्यांवर आता दररोज कारवाई होणार आहे. प्रशासन वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांसह, पदपथ आणि मोकळ्या जागांवर दुकान मांडणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. यात अनधिकृत बांधकामांचाही समावेश आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास आठवड्यातील दोन दिवस निश्‍चित करून देण्यात आले आहेत. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. या कारवाईबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडीची समस्या

रस्त्यावरील पदपथावर भाजी विक्रेत्यांसह , छोटे व्यापारी यांनी पदपथ काबीज केल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत . यामुळे अनेकदा नागरिकरस्त्यावरच वाहने थांबवत भाजीपाल्याची खरेदी करता. यामुळेअपघाताचे प्रमाण वाढले असून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीही होत आहे. यापूर्वी या लोकांवर कारवाई केल्यास लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करत कारवाई थोपवत असत.

VIDEO: राज्यपाल राजकारण करताहेत, त्यांना पदावर ठेवणं अयोग्य; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

महिन्याच्या ‘त्या’ वेदनांकडे दुर्लक्ष नकोच… या गंभीर आजाराचे संकेत

नियतीने पाहिली परीक्षा; वडिलांचा मृतदेह घरात असताना ‘त्याने’ सोडविला दहावीचा पेपर

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.