पुण्यात ज्या पोर्शे गाडीने दोघांना उडवलं त्या गाडीचा इतिहास काय? किती आहे गाडीची किंमत

पुण्यातील घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने बाईकस्वार दोन जणांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता बाल हक्क न्यायालयाने त्याची रवानगी आता बाल सुधार गृहात केली आहे.

पुण्यात ज्या पोर्शे गाडीने दोघांना उडवलं त्या गाडीचा इतिहास काय? किती आहे गाडीची किंमत
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 8:35 PM

पुण्यात एका अल्पवयीन राजकुमाराने आपल्या पोर्शे कारने बाईकवर सवार दोन जणांना उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सध्या देशात चर्चेत आहे. कारण अशा घटना वाढत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोन इंजिनिअर तरुण-तरुणीचा जीव घेतलाय. आपल्या आलिशान पोर्श कारने त्यांना चिरडले. हे प्रकरण जेव्हा माध्यमामध्ये आले तेव्हा दबाव वाढला. स्वत: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जात याची माहिती घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन माहिती देखील दिली.

पुणे पोर्शे कार दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्याने लोकांनी यावर नाराजी व्यक्ती केली. या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली. ज्या पोर्शे कारने या दोन जणांना बळी घेतला ती गाडी कोणती कंपनी बनवते. कोण आहे या कंपनीचा मालक?

पोर्श ही एक जर्मन कंपनी आहे. त्याचे मुख्यालय देखील जर्मनी येथेच आहे. फोक्सवॅगन ग्रुपची पोर्शे एजी ही लक्झरी कार आहे. कार कंपनी विविध प्रकारचे मॉडेल तयार करते. यामध्ये स्पोर्ट्स कार, एसयूव्ही आणि सेडानचा समावेश आहे. हे ड्रायव्हिंगच्या विविध गरजा पूर्ण करतात.

Porsche Car ची स्थापना कधी झाली

फर्डिनांड पोर्श यांनी 1931 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. त्यांनी स्वतःचा अभियांत्रिकी डिझाइन स्टुडिओ स्थापन केला. फर्डिनांड पोर्श यांनी अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी डिझाइन तयार केले. मर्सिडीज-बेंझचाही यात समावेश होता. 1938 मध्ये त्यांनी फोक्सवॅगन टाइप 1 (बीटल) कारची रचना केली, जी दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये सर्वात लोकप्रिय कार बनली. 1948 मध्ये, पोर्शने आपली पहिली कार, 356 सादर केली. ती दोन आसनी स्पोर्ट्स कार होती. जी ॲल्युमिनियम बॉडीसह डिझाइन केली होते. 356 मॉडेल खूप यशस्वी झाले. यामुळे पोर्शला स्पोर्ट्स कार उत्पादक म्हणून स्थापित करण्यात मदत झाली.

Porsche Car Price

अनेक मोठ्या लोकांकडे पोर्शे कार आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी ती खरेदी केली आहे. या गाड्यांची एक्स-शोरूम किंमत 1.61 कोटी रुपयांपासून ते 2.44 कोटी रुपयांपर्यंत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.