Pune School reopen| पुण्यातल्या शाळा कधी सुरु होणार? अजित पवारांनी अट सांगितली, आठ दिवसात शाळेची घंटा?
तिसऱ्या लाटेत केवळ शाळा कॉलेजसचा प्रश्न निर्माण झाला. पण काही ठिकाणी शाळा सोमवारपासून सुरु झाल्या येत्या १ फेब्रुवारी पासून कॉलेजस सुरु करणार असल्याचे सूतोवाच शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. या आठवड्यामध्ये आम्ही महापौर , खासदार, सर्व लोक प्रतिनिधी , प्रशासकीय अधिकारी एकत्रित बसून निर्णय घेऊ.
पुणे – कोरोनाच्या(Corona) तिसऱ्या लाटेत शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहारातील शाळां (school )अद्यापही बंद आहेत. मात्र मागील आठ दिवस रुग्णसंख्येची स्थिती लक्षात घेऊन बाबतचा निर्णय येत्या आठ दिवसात निर्णय घेतला जाईल,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar )यांनी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणा कार्यक्रमासाठी ते पुण्यात उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
आठ दिवसात शाळेची घंटा? तिसऱ्या लाटेत केवळ शाळा कॉलेजसचा प्रश्न निर्माण झाला. पण काही ठिकाणी शाळा सोमवारपासून सुरु झाल्या येत्या १ फेब्रुवारी पासून कॉलेजस सुरु करणार असल्याचे सूतोवाच शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. या आठवड्यामध्ये आम्ही महापौर , खासदार, सर्व लोक प्रतिनिधी , प्रशासकीय अधिकारी एकत्रित बसून निर्णय घेऊ. त्यावेळी पुण्यातील रुग्णांची स्थिती काय राहिल हे बघून त्यावर चर्चा करून पुण्यातील शाळांचा निर्णय घेणारा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिली .
तिसऱ्या लाटेचा व्यवसायाला फटका नाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत व्यवसाया व व्यवहारावर फार परिणाम झाला नाही. दुसऱ्या लाटेत सगळंच ठप्प झालं होतं सगळ्यांची रोजी रोटीचा थांबलेली होती. मात्र या लाटेत महाविकास आघाडी सरकारने तसे होऊन दिले नाही. तिसऱ्या लाटेत केवळ शाळा कॉलेजसचा प्रश्न निर्माण झाला. पण काही ठिकाणी शाळा सोमवारपासून सुरु झाल्या आहेत असेही ते म्हणाले आहेत.
मागच्या बैठकीत दिली होती ही माहिती मागील आठवड्यात कोरोन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत कोरोना अजूनतरी आठ आठ दिवस तरी कोरोनाचा आकडेवारी खाली येणार नाही. त्यात पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हटी रेट 27 टक्के आहे. त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू करू नये या विचारावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सगळ्यांनी एका मताने निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारच्या निर्णयानंतर शहरातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेणार. तो पर्यंत कडे निर्णय घेणार नाही. कोणत्याही प्रकारची रिस्क नको म्हणून ही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यत आला आहे. कोरोना बाबतच्या नियमावलीचा निर्णय घेत असताना आम्ही सर्वाना विचारात घेतो असा टोलाही त्यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला होता.
कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये, मी जाणीवपूर्वक सांगतोय, फडणवीस का संतापले?
काय सांगता ? जांभूळ उत्पादकांनाही मिळणार अनुदान, पण कशासाठी? वाचा सविस्तर