पूजा चव्हाण प्रकरणात गुंतल्यानेच मंत्री गायब; राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोठा दावा केला आहे. (where is minister?, radhakrishna vikhe patil Questioned on Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाण प्रकरणात गुंतल्यानेच मंत्री गायब; राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 5:08 PM

संगमनेर: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोठा दावा केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात गुंतलेले असल्यानेच मंत्री गायब आहेत, असा दावा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. विखे-पाटील यांनी थेट वन मंत्री संजय राठोड यांचं नाव न घेता हा दावा केला आहे. (where is minister?, radhakrishna vikhe patil Questioned on Pooja Chavan Suicide Case)

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संगमनेर येथे मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच जण सत्य बाहेर आलं पाहिजे असं सांगत आहेत. पण अजून मंत्रीच गायब आहे. गुन्हाही दाखल झालेला नाही. मग सत्य कसं बाहेर येणार? असा सवाल विखे-पाटील यांनी केला. हे दागी मंत्री आहेत. या प्रकरणात गुंतले असल्यानेच ते गायब आहेत. त्यांना बडतर्फ केले पाहिजे. अन्यथा सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याचा संदेश जाईल. मागीलवेळी राज्यात असंच घडलं. त्यामुळे आरोपींना पाठिशी घालणं हेच काम या सरकारने सुरू केल्याचं दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हा तर दुग्धशर्करा योग

यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनावरही आपली भूमिका व्यक्त केली. महाविकास आघाडीचे जे शिलेदार आहेत. तेच आज राज्याचे महसूलमंत्री आहेत. अहमदनगरच्या दृष्टीने हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने ठाणे जिल्ह्याच्या विभाजनासाठी तत्परता दाखवण्यात आली. तिच तत्परता नगरसाठी दाखवली तर बरं होईल, असंही त्यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

स्पोकन इंग्लिश क्लास लावण्यासाठी पूजा पुण्यात आली होती. मात्र 7 फेब्रुवारीला रात्री दीड वाजता तिने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. सुरुवातीला पूजाने आत्महत्या केल्याचंच दिसत होतं.मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमध्ये कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्याचं संभाषण असल्याचं बोललं गेलं. या संभाषणातून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे या कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने पूजाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? अशी चर्चा सुरू झाली. (where is minister?, radhakrishna vikhe patil Questioned on Pooja Chavan Suicide Case)

संबंधित बातम्या:

चित्रा वाघ यांच्यानंतर अजून एका भाजप नेत्याला धमकीचा फोन!

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सत्य का लपवताय? ठाकरे सरकारला फडणवीसांचा सवाल

(where is minister?, radhakrishna vikhe patil Questioned on Pooja Chavan Suicide Case)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.