Pune Firebrigade : आग विझवण्यासाठी जाताना पुण्याच्या हडपसरमध्ये अग्निशामक दलाची गाडी पलटी; एक जवान जखमी
अग्निशामक दलाच्या (Firebrigade) वाहनाचा आज अपघात झाला. सकाळी खराडी, उबाळे नगर येथे दुकानांना लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाची वाहने जात असताना हडपसर (Hadapsar) अग्निशामक केंद्र येथील देवदूत वाहन मगरपट्टा येथे पलटी झाले.
पुणे : अग्निशामक दलाच्या (Firebrigade) वाहनाचा आज अपघात झाला. सकाळी खराडी, उबाळे नगर येथे दुकानांना लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाची वाहने जात असताना हडपसर (Hadapsar) अग्निशामक केंद्र येथील देवदूत वाहन मगरपट्टा येथे पलटी झाले. या अपघातात एक जवान जखमी झाला आहे. त्यास उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक असून इतर जवान सुखरूप आहेत. सकाळी खराडीतील (Kharadi) उबाळेनगर येथे फर्निचरच्या दुकानांना आग लागली होती. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी एक ते दीड तासात ती आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, आग विझवण्यासाठी जात असताना अग्निशामक गाडीचा हा अपघात झाला. यात एक जवान जखमी झाला. तर दुसरीकडे आगीत एकूण बारा दुकाने जळून खाक झाली.
सकाळी घडली होती घटना
या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. फर्निचरसह रेडियम, ऑटोमोबाइल, मोबाइलच्या एकूण बारा दुकानांना आगीची पूर्ण झळ बसली आहे. खराडीतल्या उबाळेनगरात महालक्ष्मी लॉन्ससमोर सकाळी अकराच्या दरम्यान ही आगीची घटना घडली. यावेळी घटनास्थळी पुणे आणि पीएमआरडीए अग्निशामक दलाची एकूण 6 वाहने दाखल झाली होती. एक ते दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामकच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. यावेळी मोठ्या प्रमाणात धूर परिसरात झाला होता.