PM Narendra Modi: पंतप्रधानांच्या उपस्थितीत महाराष्ट्र ‘सरकार’चं भाषण नाहीच, खुद्द मोदींनीही अजित पवारांची व्यासपीठाला आठवण करुन दिली, नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत आले होते. यावेळी त्यांनी शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. त्यानंतर सभा स्थळी आले. त्यांच्यासोबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटीलही होते.
देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आज देहूत आहेत. संत तुकारामांच्या शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित केलं. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. त्यानंतर थेट मोदी बोलायला उभे राहिले. अजित पवार यांना या सभेत भाषणाची संधीच दिली नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाच भाषण करण्याची संधी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्य सरकारच्या प्रतिनिधीलाच भाषणापासून वंचित ठेवण्यात आल्यानेही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. जेव्हा मोदींना भाषणासाठी पाचारण करण्यात आले, तेव्हा अजितदादांचं भाषण राहिल्याचं मोदींनी सूत्रसंचालकांना आठवण करून दिली. मात्र, मोदी यांचं नाव जाहीर झाल्याने ते भाषणासाठी उठले. मात्र, मोदींनी आपल्या भाषणात अजितदादांचा आवर्जुन उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत आले होते. यावेळी त्यांनी शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. त्यानंतर सभा स्थळी आले. त्यांच्यासोबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटीलही होते. स्टेजवरही हे नेते उपस्थित होते. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. त्यानंतर मोदींच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. नंतर सूत्रसंचालकांने भाषणासाठी मोदींचं नाव पुकारलं. तेव्हा मोदींनी अजित पवार भाषण करायचे राहिले असल्याचं हाताने खुणावलं. पण अजितदादांनीही तुम्ही भाषण करा, असं सांगितलं. भाषणासाठी नाव जाहीर झाल्यामुळे मोदींना उठवावं लागलं. पण भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी अजितदादांच्या नावाचा उल्लेख केला. पण सरकारचा प्रतिनिधी म्हणून अजित पवार यांचं भाषण झालंच नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
देवाची अनुभूती होते
मनुष्य जन्मात सर्वात दुर्मिळ गोष्ट काय असेल तर संतांचा सत्संग. आपल्या शास्त्रातही ते सांगितलंय. संतांची कृपा, अनुभूती झाल्यावर देवाची अनुभूती होत असल्याचा अनुभव आपोआप होतो. मीही इथे हीच अनुभूती घेत आहे. देहू हे संत शिरोमणी जगदगुरू तुकारामांचं जन्मस्थळ आहे. तसेच कर्मस्थळ. देहूत पांडूरंगाचं वास्तव्य आहे. इथले लोक भक्तीने ओतप्रोत भरलेले आहेत. संत स्वरुप आहेत. त्यामुळे तुम्हाला वंदन करतो, असं म्हणतं मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.
पालखी मार्गासाठी 11 हजार कोटी
काही दिवसांपूर्वीच मला पालखी मार्गातील दोन राष्ट्रीय महामार्गाचं फोरलेनचं भूमीपूजन करण्याची संधी मिळाली. ज्ञानेश्वर पालखी मार्गाचं पाच टप्प्यात काम होणार आहे. तुकाराम पालखी मार्गाचं काम तीन टप्प्यात होणार आहे. या सर्व टप्प्यात 350 किमी लांबीचे हायवे मार्ग होणार आहेत. त्यासाठी 11 हजार कोटीहून अधिक खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे विकास होईल, असं त्यांनी सांगितलं.
ज्ञानाची आधारशिला
पवित्र शिळेवर तुकारांमांनी तपस्या केली. ही शिळा बोध आणि वैराग्याची साक्ष बनली आहे. शिळा नाही. भक्ती आणि ज्ञानाची आधार शिला आहे, असं मोदी म्हणाले. भक्ती शक्तीचं केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतीचं प्रतिक आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, असंही ते म्हणाले.