“दादा जसं म्हणतील तसं; पण, मलाचं का ट्रोल केलं जातं?,” गौतमी पाटील हिला पडलेला प्रश्न समजून घ्या

चूक झाली. मी माफी मागितली. सर्वांनी माफ केलं. तरीही मला ट्रोल केलं जातं. काही लोकं मला बोलतात. मला एकटीलाच का ट्रोल केलं जातं, असा प्रश्न तिनं उपस्थित केला.

दादा जसं म्हणतील तसं; पण, मलाचं का ट्रोल केलं जातं?, गौतमी पाटील हिला पडलेला प्रश्न समजून घ्या
गौतमी पाटील
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 10:05 AM

पुणे : लावणी कलावंत गौतमी पाटील (Gautami Patil) हिने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची माफी मागितली. लावणी सर्वांना पाहता यावी. अशी सादर करावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली होती. गौतमी पाटील हिनं अजित पवार यांची माफी मागितली आहे. गौतमी पाटील म्हणाली, दादा खूप मोठे आहेत. मी त्यांना काही बोलू शकत नाही. दादा जसं म्हणतील तसं. फक्त मला एकचं म्हणायचं आहे की, मी कुठं चुकतेय. जे चुकलं त्यावेळी माफी मागितली होती. तिथून पुढं माझ्याकडून काही चूक झाली नाही.

मलाचं ट्रोल का केलं जातं?

गौतमी पाटील म्हणाली की, मी व्यवस्थित डान्स केला. तरीही परत मलाचं ट्रोल (Troll) का केलं जाते. चूक झाली. मी माफी मागितली. सर्वांनी माफ केलं. तरीही मला ट्रोल केलं जातं. काही लोकं मला बोलतात. मला एकटीलाच का ट्रोल केलं जातं, असा प्रश्न तिनं उपस्थित केला.

डान्सवर अश्लिलतेचा आरोप

गौतमी पाटील लावणीचे कार्यक्रम सादर करते. तिच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आपल्या गावात व्हावा, असा प्रयत्न असतो. पण, तिला विरोधही तेवढाच होता. तिच्या गाण्यावर अश्लिलतेचा आरोप केला जातो.

बंदोबस्तात झाला कार्यक्रम

नुकताच पुणे जिल्ह्यातल्या बहीरवाडी येते लावणीचा कार्यक्रम होता. प्रेक्षकांनी गौतमीला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, काही तरुणांनी तिच्या कार्यक्रमात धूडगूस घातला. त्यामुळे कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली. महिलांनी हातात काठ्या घेऊन तरुणांना शांत केले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात तिचा कार्यक्रम झाला.

गौतमीच्या कार्यक्रमांना गर्दी होत असली, तर तिच्या कार्यक्रमांना विरोधही तेवढाच होतो. गौतमीला ट्रोल केलं जातं. त्यामुळं मलाच ट्रोल का केलं जातं, असा सवाल तिनं विचारला आहे.

गौतमीचा घुंगरु हा आगामी सिनेमा आहे. या सिनेमातील पहिली लावणी प्रेक्षकांच्या नुकतीच भेटीला आली. मी करते तुम्हाला मुजरा, असं या लावणीचे नाव आहे. ही लावणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या लावणीतील दिलखेचक अदांनी तिनं लक्ष वेधून घेतलं आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.