राज्यात नोव्हेंबर महिन्यात का पडत आहे पाऊस? शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

unseasonal rain in maharashtra | राज्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वच भागांत या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्यात का पाऊस पडत आहे? हवामान तज्ज्ञ डॉक्टर रंजन केळकर यांनी माहिती दिली.

राज्यात नोव्हेंबर महिन्यात का पडत आहे पाऊस? शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
महाराष्ट्रात दोन दिवसांपासून गारपीटसह अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. नाशिकच्या द्राक्ष पंढरीत गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले. डाळिंब बाग आणि कांदा पीकाचे नुकसान झाले आहे.
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 11:13 AM

पुणे, दि. 28 नोव्हेंबर 2023 | राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. पाऊस आणि गारपीटमुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यांत का पाऊस पडत आहे? हा प्रश्न शेतकऱ्यांप्रमाणे सर्वसामान्यांनाही पडला आहे. गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्यात पाऊस पडण्याचा घटना वाढत आहे. त्याला कारण पश्चिम आणि पूर्वेकडील वारे आहेत. दोन्ही वारे महाराष्ट्रात भिडत आहेत. यामुळे हिवाळ्यात गारपीट आणि पाऊस पडत आहे, असे हवामान तज्ज्ञ आणि भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉक्टर रंजन केळकर यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी करावा हा बदल

नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडत आहे. पावसाचे प्रमाण ओळखून शेतकऱ्यांनी पिके घ्यावीत. या पावसाला अवकाळी म्हणता येईल. पुणे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ३० मिमी पावसाची नोंद गेल्या काही वर्षांत झाली आहे. भारतात गारा पडण्याच्या घटना वारंवार घडत नाहीत उत्तर भारतात हिवाळ्यात हिमवृष्टी होते. परंतु हिवाळ्यात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. नोव्हेंबरमध्ये असे वातावरण नेहमीच असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कधी कोणते हवामान असते, हे ओळखून पिके घ्यावीत.

परस्परविरोधी प्रवाह भिडल्यास पाऊस

भारत उष्ण कटीबंधीय देश आहे. उष्ण कंटीबंधाचे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. शीत कटीबंधाचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. एकीकडे शीत व शुष्क हवा तर दुसरीकडे उष्ण आणि दमट हवा यांची देवाणघेवाण होते. यामुळे वादळी पावसासह गारपीट होते.

हे सुद्धा वाचा

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत पाऊस

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरु राहणार आहे. यामुळे आणखी पिकांना फटका बसू शकतो. अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तक्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे गुजरातमध्ये अनेक भागांत अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे राज्याच्या विविध भागांत वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला आहे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.