Weather Update : देशातील काही भागांत जलप्रलय, राज्यात काय आहे पावसाची परिस्थिती
weather update and rain : महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दुसरीकडे उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे.
पुणे : देशभरात मान्सूनचा जोर चांगलाच सुरु आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये हाहा:कार माजला आहे. नवी दिल्लीतील ४० वर्षांचा विक्रम पावसाने मोडला आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रस्ते, पूल पाण्यामुळे वाहून जात आहे. शहरामधील रस्त्याचे रुपांतर नदीत झाले आहे. उत्तर भारतात पावसाचा कहर सुरु असताना महाराष्ट्रात अजून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस नाही. यामुळे राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा नाही.
उत्तर भारतात का सुरु आहे पाऊस
भारतीय हवामान विभगाचे अध्यक्ष मृत्यूंजय महापात्रा यांनी म्हटले आहे की, देशातील अनेक राज्यांमध्ये दोन मान्सून सक्रीय झाले आहे. एका म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि दुसरे म्हणजे बंगालच्या उपसागरातून येणारे मान्सूनचे वारे आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. रविवारी वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि पश्चिम बंगालच्या उपसागरातून आलेले मान्सून वाऱ्याचे मिश्रण झाले. यामुळे हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरु आहे.
July Rainfall ??IMD ने जुलैसाठी वर्तवलेला हंगामी अंदाज महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता दर्शवतो ?विस्तारित श्रेणीचा अंदाज देखील हेच सूचित करतो?पुढील 5 दिवसांचा अंदाज चांगला दिसत आहे ?इतर मॉडेल देखील समान ट्रेंड दर्शवितात pic.twitter.com/hbsF4jd7cw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 10, 2023
देशातील या राज्यांमध्ये सामान्यापेक्षा जास्त पाऊस
देशातील दहा राज्यांमध्ये सामान्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात २७ टक्के कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील धरणसाठ्यात २९ टक्केच जलसाठा आहे.
महाराष्ट्रात आता पाऊस कधी
राज्यात पुढील पाच दिवसांत चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. IMD ने जुलैसाठी वर्तवलेला हंगामी अंदाज महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भात मंगळवारी विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. नागपुरात मंगळवारी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा पाऊस आहे.
पुणे, मुंबईत मान्सून चांगला
सध्या मान्सून पुणे, मुंबईत सक्रीय आहे. यामुळे लोणावळा, खंडाळा, इगतपुरी या ठिकाणी धबधबे वाहू लागले आहेत. मुंबई, ठाण्यासह अनेक हौशी पर्यटक याठिकाणी धबधब्यावर येऊन निसर्गाचा आनंद घेत आहे. पुणे शहरातील अनेक जण वर्षापर्यटनासाठी येत आहेत. शनिवार अन् रविवारी पर्यटकांची चांगली गर्दी लोणावळ्यात होत आहे. गर्दीमुळे लोणावळा पोलिसांनी लोहगडावर जाण्यासाठी नियमावली तयार केली आहे.