बैलगाडा शर्यतीप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे, बैलगाडा मालकांकडून वळसे-पाटलांचा सत्कार
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतेच बैलगाडा शर्यतीप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पुणे : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतेच बैलगाडा शर्यतीप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या घोषणेनंतर नुकताच दिलीप वळसे पाटील यांचा पारगाव या ठिकाणी सत्कार करण्यात आला. (Withdrawn charges filed regarding Bullock cart race in sangli, Bullock cart owners felicitate Dilip Walse-Patil)
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैलगाडा शर्यतीप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर बैलगाडा मालकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बैलगाडा मालक आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी या पुढच्या काळात कशा पद्धतीने लढा दिला पाहिजे यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
वेगळ्या पर्यायाचा मी नक्की विचार करेन
राज्य आणि केंद्र सरकार बैलगाडा शर्यतीविरुद्ध नाही, असं मला वाटतं. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याला अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे, आपण ज्या मार्गाने चाललो आहे तोच मार्ग यामध्ये योग्य आहे. यात यापेक्षा इतर कुठला वेगळा मार्ग असेल तर मला जरूर सांगा, मी त्याचा नक्की विचार करेन, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
सुप्रीम कोर्टात तिढा सुटल्याशिवाय काहीही शक्य नाही
वळसे पाटील म्हणाले की, तसेच माझ्या दृष्टिकोनातून कायद्याची थोडेफार आकलन मला आहे. सुप्रीम कोर्टातला हा तिढा सुटल्याशिवाय काहीही करता येणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. याशिवाय राज्य शासनाचे अॅडव्होकेट जनरल यांना बोलावून घेतो. आपण सर्व त्यांना आपली मते सांगू आणि ही केस कशी लवकर बोर्डावर येईल ते पाहू. त्याशिवाय यावर योग्य तो निर्णय करून घ्यायचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
इतर बातम्या
नारायण राणे म्हणाले, एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले; आता विनायक राऊत म्हणतात, राणेंना ठोकम ठोकीची सवयच
(Withdrawn charges filed regarding Bullock cart race in sangli, Bullock cart owners felicitate Dilip Walse-Patil)