पुणेः सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे, विवाहित महिलांना मारहाण, खून अशा घटना राज्याबरोबरच देशात घडत असतानाच सोमवारी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथे एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर एकातर्फी प्रेमातून (One sided love) धारदार शस्त्राने हल्ला (Assault with weapons) केला होता. यामध्ये त्या मुलगी जखमी झाली होती. तिच्या पोटाला आणि हाताला गंभीर जखम झाली आहे. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला झाल्यानंतर आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी अन्याग्रस्त असलेल्या मुलीची चौकशी करुन मुलीची दहावीची परीक्षा असल्याने तिच्या अभ्यासाची चौकशी करुन याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे अश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिले.
वडगाव शेरी येथील मुलीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला केल्यानंतर काही वेळातच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या व्यक्तीने मुलीवर हल्ला केला होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या संशयितानेही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
एकतर्फी प्रेमातून ज्या मुलीवर हल्ला करण्यात आला आहे, त्या मुलीची मानसिक अवस्था चांगली नसल्याने तिचा जबाब 24 तासात नोंदवला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील जखमी असलेली मुलगी दहावीची परीक्षा देत असल्याने आणि सध्या ती जखमी असल्यामुळे रुग्णालयामध्ये तिला रायटर देऊन पेपर देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मुलीवर एकतर्फी प्रेमातून धारदार शस्त्राने वार केल्यानंतर आणि जखमी होऊनही शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांनी त्यांना कोणतीच मदत केली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. तसेच या या प्रकरणाचा तपास करुन या तपासात जी माहिती समोर येईल त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाणार असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या जखमी मुलगी आपल्या वडिलांबरोबर सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून अन्यायग्रस्त मुलीने राज्य महिला आयोगाची भेट घ्यावी, महिला आयोग तिला योग्य ती मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकतर्फी प्रेमातून हल्ला झालेल्या मुलीची चौकशी करण्यासाठी आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी मुलीची चौकशी केल्यानंतर त्यांना ज्या वेळी कर्नाटकातील हिजाब प्रश्न जेव्ह देशात चर्चेला गेला. त्यानंतर आजही न्यायालयाने हिजाबविषयी निकाल दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांना ज्यावेळी विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सांगितले की, सर्वांनी न्यायालयाच्य निर्णयाचा आदर करायला हवा असे सांगण्यात आले.
संबंधित बातम्या
बारावीच्या केमिस्ट्रीचा पेपर फुटीचा प्रकार नाही , तर कॉपीचा प्रकार- बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी