Pune crime : केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरूण कामगाराचा मृत्यू, नातेवाईकांची कंपनीविरोधात खेड पोलिसांत धाव

मृत स्वस्तिक याची घरची परिस्थिती बिकट असून घरातील एकुलता एक कमावता व्यक्ती होता. त्याचा मोठा भाऊ हा शिक्षित मात्र बेकार असून त्याचे वडील हे अंध आहेत तर त्याची आई मोलमजुरी करून घराला हातभर लावत आहे.

Pune crime : केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरूण कामगाराचा मृत्यू, नातेवाईकांची कंपनीविरोधात खेड पोलिसांत धाव
केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरूण कामगाराचा मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 5:32 PM

खेड, पुणे : खासगी कंपनीत केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून एका तरूण कामगाराचा मृत्यू (Worker dies) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर येथे असलेल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये (SEZ) असलेल्या अॅबरेडर टेक्नॉलॉजिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ही घटना घडली आहे. यामध्ये स्वस्तिक दयाराम शेलार असे मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. कंपनीत काम करीत असताना मशीनमध्ये हात जाऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. कंपनी प्रशासनाच्या विरोधात खेड पोलीस स्टेशनमध्ये (Khed police station) गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचा मोठा भाऊ प्रतीक दयाराम शेलार यांनी खेड पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे.

खेड पोलिसांत फिर्याद

यामध्ये त्याचा भाऊ स्वस्तिक दयाराम शेलार (वय 25) हा सायगाव या ठिकाणी राहत असून खेड तालुक्यातील कनेरसर येथील अॅबरेडर टेक्नॉलॉजिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गेल्या सहा महिन्यापासून नोकरी करत होता. दिनांक 22 ऑगस्टच्या रात्री तो कामावर गेला असता कंपनीत अपघात झाला.

कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल

याबाबतची माहिती त्याच कंपनीत कामाला असलेल्या त्याचा आत्ये भाऊ योगेश यांनी दिली. त्यानंतर प्रतीक हा चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेला असता त्या ठिकाणी कंपनीचे कोणते कर्मचारी-अधिकारी उपस्थित नव्हते. त्या ठिकाणी पोलिसांनी स्वस्तिक दयाराम शेलार हा कंपनीमध्ये अपघात झाला, त्यात तो मृत झाल्याची माहिती त्यांना दिली. याबाबत कंपनीने हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा मुळे चालू मशीनमध्ये अडकून स्वस्तिकचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

एकुलता एक कमावता व्यक्ती

मृत स्वस्तिक याची घरची परिस्थिती बिकट असून घरातील एकुलता एक कमावता व्यक्ती होता. त्याचा मोठा भाऊ हा शिक्षित मात्र बेकार असून त्याचे वडील हे अंध आहेत तर त्याची आई मोलमजुरी करून घराला हातभर लावत आहे. स्वस्तिकच्या मृत्यूमुळे या कटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून खेड पोलीस उप निरीक्षक भारत भोसले हे पुढील तपास करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.