प्रियांका गांधी दुसरी इंदिराच, लडकी हूँ, लड सकती हूँ नारा देशव्यापी-यशोमती ठाकूर
महिला आता देश घडल्याशिवाय राहणार नाहीत. 'लडकी हूं, लड सकती हूं' हा नारा आता परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी पुण्यात व्यक्त केला.
पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र आणि राज्यात जणू सासू-सुनेचे भाडण रोज सुरू आहे. केंद्रातील लोकशाही विरोधी भाजपप्रणीत सरकारने देशभरात माजलेली अनागोंदी, अस्थिरता, महागाई याविरोधात संघर्ष करायचा आहे. आणि हे जुलमी सरकार उलथवून टाकण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती महिलांमध्ये आहे. संसाराचा गाडा ओढत असताना महिला समाज घडवत असतात, त्याच महिला आता देश घडल्याशिवाय राहणार नाहीत. ‘लडकी हूं, लड सकती हूं’ हा नारा आता परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी पुण्यात व्यक्त केला. महिला काँग्रेसच्यावतीने (Congress) आज पुण्यात आयोजिलेल्या ‘लडकी हूं, लड सकती हूं” या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य आपले चौथे सुधारित आणि अद्ययावत महिला धोरण लवकरच जाहीर करणार आहे. ज्या वेळेला महिला धोरण तयार झालं त्यासाठी सोनियाजींनी खूप मोठा पुढाकार घेतला होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात पाहिले महिला धोरण सादर झाले होते, असे उद्गार यावेळी ठाकूर यांनी काढले.
केंद्र सरकार नेहमी दुजाभाव करतंय
पुरोगामी महाराष्ट्राने केंद्र सरकारला खूप उपक्रम दिले आहेत. मात्र, केंद्र सरकार महाराष्ट्राला सध्या पाण्यात पहात आहे. महाराष्ट्राबद्दल दुजाभाव केंद्र सरकारच्या मनात असून दुटप्पी धोरण आखले जात आहे. केंद्र सरकार लोकशाही आणि संविधान तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी ठाकूर यांनी केला. मात्र केंद्राचा हा प्रयत्न देशातील महिला भगिनी कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. आपल्या महिला भगिनी आता बाहेर पडल्या आहेत, जर आता संघर्ष केला नाही, परिवर्तन केले नाही, तर उद्याची येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे हे आंदोलन खऱ्या अर्थाने पुढे न्यायला पाहिजे असे सांगत त्यांनी ‘ लडकी हूँ, लड सकती हूँ’ हा प्रियांकाजींचा नारा यावेळी दिला. राज्यातील प्रत्येक महिला भगिनीचा आदर झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, यासाठी हे आंदोलन आपण तळागाळात पोहोचवलं पाहिजे. त्यासाठी कटिबद्ध होऊन आपण हे आंदोलन पुढे नेऊ या, असे आवाहन ठाकूर यांनी महिला कार्यकर्त्यांना केले.
केसीआर भेटीवर काय म्हणाल्या?
तेलंगणा चे मुख्यमंत्री केसीआर यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त यशोमती ठाकूर यांनी तिखट प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला दिसतो. तिसरी आघाडी निर्माण करण्याचा काही प्रादेशिक पक्षांचा प्रयत्न आहे. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. सध्या राज्य विरूद्ध केंद्र असा वाद देशात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपेतर राज्यांची आघाडी एक ऐतिहासिक गोष्ट आहे. देशात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ शकेल अशी स्थिती सध्या दिसतेय. विविध राज्यांमधील राज्यपालांची मनमानी, केंद्राचा हस्तक्षेप, केंद्रीय एजन्सींचा गुन्हेगारी वापर यामुळे देशाची अखंडता धोक्यात आली आहे. या सर्व धोक्यांवर काँग्रेस मोदी सत्तेवर आल्यापासून बोलत आलीय. जे राजकीय पक्ष तेव्हा मोदींसोबत होते त्यांना हे धोके उशीरा समजले. देर आए, दुरूस्त आए अशी स्थिती आहे. त्या सर्वांचं मी स्वागतच करते. आज काँग्रेसने देशव्यापी आंदोलन उभारलं आहे, प्रसंगी जीव धोक्यात घालून हा लढा सुरू ठेवला आहे. काँग्रेस ने मोदींचा विरोध करत असताना कुठलाही इगो मध्ये न आणता जिथे जिथे शक्य आहे तिथे एक पाऊल मागे घेऊन मोदी विरोधातली लढाई मजबूत केली. आज मोदी विरोधकांच्या आवाजाला जी बळकटी मिळालीय ती काँग्रेस मुळेच आहे. यापुढे ही ही लढाई काँग्रेस लढेल. काँग्रेसने लोकशाहीविरोधी घटकांशी सामना करताना कधीच तडजोड केली नाही. देशाची लोकशाही, धर्मनिरपेक्षता, राज्यघटना यांच्या रक्षणासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढू, असं ही यशोमती ठाकूर यांनी सांगीतलं आहे.
आरोग्य क्षेत्राला हवा वाढीव निधी, केंद्राचं उत्तर; ..ही तर राज्यांची जबाबदारी!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आराखडा तातडीने सादर करा, जयंत पाटलांचे कुणाला आदेश?
सैन्य तयार ठेवा, 2024मध्ये आपल्याला जिंकायचंय; जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन