Rain | राज्यात हिवाळ्यात यलो अन् ऑरेंज अलर्ट, तीन दिवस पाऊस

IMD Rain News | राज्यात पुढील काही दिवस पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने यासाठी पुढील तीन दिवस यलो किंवा ऑरेंज अलर्ट दिला आहे. हिवाळी मोसमी वारा व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थितीमुळे पाऊस पडणार आहे. सध्या या परिस्थितीमुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस सुरु आहे.

Rain | राज्यात हिवाळ्यात यलो अन् ऑरेंज अलर्ट, तीन दिवस पाऊस
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 11:20 AM

पुणे, दि. 25 नोव्हेंबर 2023 | राज्यात हिवाळा सुरु झाला आहे. अनेक शहरांमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. आता राज्यात हिवाळ्यात पावसाचा अलर्ट आला आहे. राज्यात चार दिवस कुठे यलो आणि कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. परंतु खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतात आपला कापूस किंवा इतर काही माल ठेवला असेल तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कोणत्या जिल्ह्यांत अलर्ट

हे सुद्धा वाचा

मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील फक्त जळगाव जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही. विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्हा वगळता इतर ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कोकणातही २५ नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट असणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर जिल्ह्यात यलो अलर्ट असणार आहे. २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट असणार आहे.

रब्बी पिकाला होणार फायदा

देशात सध्या हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. या पावसाचा रब्बी पिकास फायदा होणार आहे. यंदा देशात आणि राज्यात सरासरी पाऊस पडला नाही.  यामुळे धरणांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. परंतु आता नोव्हेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे पिकांची वाढ जोमाने होईल आणि उत्पन्न वाढणार आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.