Pune : सीएनजी पंपामुळे गर्दी होते म्हणून टोळक्याचा धुडगूस, कर्मचाऱ्यांना मारहाण अन् दगडफेक; पुण्यातल्या नऱ्हेची घटना

सिंहगड रस्ता पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासले आहे. सकाळी ऑफिसची वेळ असल्याने एकतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Pune : सीएनजी पंपामुळे गर्दी होते म्हणून टोळक्याचा धुडगूस, कर्मचाऱ्यांना मारहाण अन् दगडफेक; पुण्यातल्या नऱ्हेची घटना
सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 5:25 PM

पुणे : एकीकडे सीएनजीचे भाव सर्वठिकाणी वाढले आहेत. त्यातच सीएनजी पंपावरच्या (CNG Pump) कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. नऱ्हे परिसरातील एका पंपावरील कर्मचाऱ्याला ही मारहाण झाली आहे. सीएनजी पंपामुळे वाहतूककोंडी होत असल्याचा राग मनात धरून काही काही युवकांकडून येथील पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. एवढेच नाही, तर या पंपावर दगडफेकही (Stone pelting) करण्यात आली. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नऱ्हे परिसरातील युवांश गॅस स्टेशन या पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची रोजच गर्दी होत असते. त्याचा परिणाम या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी (Traffic) होते. याच रागातून एका युवकाने तेथील कर्मचाऱ्याला विचारणा केली. त्याचे पर्यवसान वादामध्ये आणि नंतर मारहाणीत झाले.

इतर साथीदारांनाही बोलावले

संबंधित युवकाने कर्मचाऱ्याला विचारणा करत मारहाण केली. त्याने त्याच्या इतर साथीदारांनाही बोलावले. जवळपास 8 ते 10 जणांच्या टोळक्याने मारहाण केली. यामध्ये कर्मचाऱ्याच्या कानाला जखम झाली आहे. अशाप्रकारे टोळक्याने दहशत निर्माण केल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सिंहगड रस्ता पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासले आहे.

हे सुद्धा वाचा

सिंहगड पोलिसांकडून तपास

सकाळी ऑफिसची वेळ असल्याने एकतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर त्याचवेळी सीएनजी भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांचा खोळंबा झाला होता. आधी विचारणा करत वाद घातला त्यानंतर शिवीगाळ करत हात उचलत मारहाण करण्यात आली. कमी म्हणून की काय,  इतर साथीदारांना बोलावत ऐन कार्यालयीन वेळेत धुडगूस घालण्यात आला. दरम्यान, या मारहाणीमुळे परिसरात घबराट पसरली होती. या सर्व घटनेचा तपास आता सिंहगड पोलीस करीत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.