स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा तरुण चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत घुसला, प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करताच गोंधळ
Pune Chandrakant Patil | उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुणे शहरात पत्रकार परिषद सुरु होती. त्यावेळी गोंधळ उडला. एका पत्रकार नसलेल्या व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला. त्यानंतर त्या युवकाला बाजूला करण्यात आला. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा तरुण होता.
अभिजित पोते, पुणे, दि.21 डिसेंबर | पुणे शहरात चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सुरु असताना गुरुवारी गोंधळ उडला. वन विभागाच्या परीक्षांची तयारी करणार एक तरुण चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत घुसला. त्याने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. अनोळखी व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील गडबडले. त्यांनी तू कोण ? तू पत्रकार आहे का ? असे विचारले. त्याने नकार देताच त्याला बाजूला नेण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना केल्या. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.
काय आहे प्रकरण
पुणे शहरात स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर पुस्तक महोत्सव सुरु आहे. त्या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला. परंतु तो पत्रकार नसल्याचे लक्षात आले. मग त्याला बाजूला घ्या, असे चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना सांगितले.
कोण होतो तो तरुण
चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारणारा तरुणाचे नाव कृणाल आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या परीक्षेसाठी तयारी करत होते. अनेकदा प्रयत्न करत असताना त्याला नोकरी लागली नाही. त्यामुळे यासंदर्भात प्रश्न त्याने विचारला होतो. परंतु तो पत्रकार नव्हता तर सामान्य व्यक्ती होते. त्यामुळे त्याला बाजूला करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर त्याला सोडून दिले.
मागील महिन्यात गोंधळ
मागील महिन्यात एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत पुणे शहरात गोंधळ उडला होता. त्यांच्या पत्रकार परिषदेत शाईफेक झाली होती. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून काळी पावडर फेकण्याचा प्रयत्न नोव्हेंबर महिन्यात झाला होता. तसेच ते पत्रकार परिषद घेत असताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरु असताना एका व्यक्तिने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने शाई काढून सदावर्ते यांच्यावर फेकली होती.