चंद्रकांत पाटील यांच्या भाषणावेळी तरुणाचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न, खिशात सापडली कीटकनाशकाची बाटली

चंद्रकांत पाटील यांच्या खेडमधील कार्यक्रमावेळी एक अनपेक्षित प्रकार घडलेला बघायला मिळाला. चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरु झालं आणि एका शेतकरी तरुणाने घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

चंद्रकांत पाटील यांच्या भाषणावेळी तरुणाचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न, खिशात सापडली कीटकनाशकाची बाटली
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 5:55 PM

पुणे | 9 सप्टेंबर 2023 : भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खेड येथील कार्यक्रमात एका तरुणाने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने शेतीविषयी प्रश्न विचारुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरु होत असतानाच हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला समज दिली. तसेच पोलिसांनी देखील तरुणाला ताब्यात घेत विचारपूस केली. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात या प्रकरणावर भाष्य केलं.

चंद्रकांत पाटील यांच्यावर काही महिन्यांपूर्वी शाईफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. संबंधित प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. या प्रकरणाची आठवण आणणारं प्रकरण आज घडलं आहे. एका तरुणाने चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाच्यावेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी तरुणाला सुनावलं

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरु झाल्यानंतर संबंधित प्रकार घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियका सांगत असताना विरोधकांकडून सभेत गोंधळ घालण्यासाठी अशी लोकं पाठवली जातात, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

“मुख्य वक्ता बोलत असताना प्रश्न विचारायचा आणि फोटो काढून भाषणात गोंधळ झाल्याचं व्हायरल करायचं. माझा 45 वर्षाचा अनुभव आहे. अनेक मंत्रीपद मी पाहिलीत, मोजतो, मी तुला…”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात शेतकरी तरुणाला सुनावलं.

तरुणाने असं नेमकं का केलं?

चंद्रकांत पाटील यांच्या सभेनंतर पोलिसांकडून शेतकरी तरुणाची विचारपूस करत असताना त्याच्या खिशात कीटकनाशक औषध बाटली आढळून आली. भामा-आसखेड धरणातील पाणी भामा नदी पात्रात सोडण्याची तरुण शेतकऱ्याची मागणी होती. कृष्णा मारुती टोपे असं या तरुण शेतकऱ्यांचं नाव आहे. तरुणाच्या खिशात कीटकनाशकाची बाटली सापडल्याने त्याच्या मनात नेमकं काय होतं? असा प्रश्न निर्माण झालाय. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.