हे पुणे आहे…, मुलीच्या मागे कोयता घेऊन धावणाऱ्या तरुणाला पुणेकरांनी दाखवून दिले

Pune Crime News : पुणे शहरात मंगळवारी पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्रिकोणी प्रेम प्रकरणातून युवक अन् युवतीवर हल्ला झाला आहे. अगदी पोलीस चौकीसमोरच हा प्रकार घडला. परंतु पुणेकरांनी हल्लेखोरास पुणेरी स्वाद दिला, त्यामुळे अनर्थ टळला.

हे पुणे आहे..., मुलीच्या मागे कोयता घेऊन धावणाऱ्या तरुणाला पुणेकरांनी दाखवून दिले
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलांशी अश्लील वर्तन करणारा अटक
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 3:08 PM

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरात दर्शना पवार हिची हत्या झाल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शनाने तिचा मित्र असलेल्या राहुल हंडोरे याला लग्नास नकार दिला. त्यामुळे दर्शनाची हत्या झाली. त्यानंतर मंगळवारी २७ जून रोजी पुन्हा युवक-युवतीवर हल्ला झाला. त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाला. परंतु यावेळी पुणेकरांनी हल्ला करणाऱ्या तरुणाला पुणे स्वाद दाखवत चांगलाच चोप दिला. त्यामुळे त्या तरुणीचे प्राण वाचले अन्यथा पुणे शहरात पुन्हा अनर्थ घडला असता. त्या माथेफिरु तरुणास धाडसाने ताब्यात घेणाऱ्या युवकाचे कौतूक होत आहे.

काय घडला प्रकार

पुणे शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी युवक अन् युवतीवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला. कोयत्याने हा हल्ला झाला आहे. अगदी पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी युवक अन् युवती गाडीवरुन उतरले. त्यावेळी शंतनू जाधव नावाचा व्यक्ती कोयता घेऊन त्याचा मागे धावत आला. त्याने दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. युवक एका दिशेला पळाला तर युवती दुसऱ्या दिशेला पळाली. शंतनू त्या युवतीचा मागे धावत होतो. तो तिच्यावर प्राणघात हल्ला करणार तोच काही युवकांनी त्याला पकडले. त्याच्याकडून कोयता हिसकवून त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या हवाली केले.

तरुणी हल्ला प्रकरण गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपी शंतनू जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आरोपी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. भादवि ३०७ कलमा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जखमी तरूणीवर उपचार पूर्ण झाले आहे. पुणे शहरात घडलेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे सुद्धा वाचा

महिला आयोगाकडून दखल

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात त्यांनी घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे म्हटले आहे. आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.