पुण्यातील महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात, कुठे झिका व्हायरसचा प्रवेश?, कुठल्या हॉस्पिटलमध्ये नोकरभरती?
Pune News | पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात समजून घ्या. मुंबईप्रमाणे पुणे देखील एक मोठ महानगर आहे. पुण्यातही दररोज राजकीय, सामाजिक घडामोडी घडत असतात. पुण्यातील एका जिल्हा रुग्णालयात नोकरभरतीची संधी आहे.
पुणे (अभिजीत पोते) : पुणे हे राज्यातील एक महत्त्वाच शहर आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या थोडक्यात. पुण्यात पुन्हा एकदा झिका व्हायरसने शिरकाव केला आहे. येरवडा येथे राहणारी एक 64 वर्षीय महिला झिका पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तिला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. रक्ताचा नमुना 10 नोव्हेंबरला NIV ला पाठवला. 11 नोव्हेंबर रोजी तिचा झिका पॉझिटीव्ह अहवाल आला. ती 15 ऑक्टोबरला केरळला गेली होती, तेव्हा तिला झिकाची बाधा झाल्याची शक्यता आहे. आता तिची तब्येत स्थिर आहे. तिच्या कुटुंबातील 5 जणांचे रक्त तपासणीसाठी घेतले आहे, त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शिवभोजन थाळी केंद्राला कायमस्वरूपी टाळे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील तब्बल 51 शिवभोजन थाळी केंद्र बंद. ठाकरे सरकारच्या महत्वकांशी प्रकल्पाला शिंदे सरकारकडून ब्रेक. काही केंद्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याने कारवाई करण्यात आली आहे, तर काही केंद्रचालकांनी परवडत नसल्याने स्वत:हून या योजनेतून माघार घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पुणे जिल्ह्यात एकूण 86 शिवभोजन थाळी केंद्र होती कार्यरत. जिल्ह्यात आता केवळ 35 केंद्रच सुरू आहेत.
दिवाळीत किती लाख लोकांचा रेल्वे प्रवास
मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ व नागपूर या पाचही विभागांत एकूण 22 लाख प्रवाशांनी दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास केला. या 5 विभागातून दिवाळीसाठी सोडण्यात आल्या होत्या एकूण 513 जादा रेल्वे गाड्या. 7.30 लाखापेक्षा अधिक प्रवाशांचा आरक्षित तिकिटावरून प्रवास. जादा रेल्वे गाड्यापैकी अनेक रेल्वे गाड्या करण्यात येणार कायमस्वरूपी. मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय.
पुण्यात जिल्हा रुग्णालयात विविध पदांसाठी भरती सुरू
पुण्यातील जिल्हा रुग्णालयात विविध पदांसाठी भरती सुरू. औंध येथील जिल्हा रुग्णालयात होणार विविध पदांच्या भरत्या. ऑफलाईन पद्धतीने करता येणार अर्ज. जिल्हा रुग्णालयातील एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार. इच्छुक उमेदवारांचा अर्ज स्वीकारायला जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ते 20 नोव्हेंबर 2023.