AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणाऱ्या ‘ऑनलाईन’ ; ॲपचे काम अंतिम टप्प्यात, आयुक्त आयुष प्रसाद यांची माहिती

या ॲपमधून बदलीच्या अर्जापासून बदलीच्या ठिकाणी नियुक्त होईपर्यंत सर्व प्रक्रिया ॲपद्वारेच पार पडणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदलीचे काम पारदर्शी होण्यास मदत होईल. तसेच बदलीची संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे ३१ मी पूर्वी शिक्षकांच्या बदल्या होतात.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणाऱ्या 'ऑनलाईन' ; ॲपचे काम अंतिम टप्प्यात, आयुक्त आयुष प्रसाद यांची  माहिती
संग्रहित छायाचित्र.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 11:27 AM

पुणे – राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या (Zilla Parishad school teachers)बदल्या ॲप (App) माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदलीसाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. येत्या दोन आठवड्यात या ॲपचे काम पूर्ण होणार आहे. हा मसुदा मोबाईल व डेस्कटॉप अश्या दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यापासून या ॲपच्या माध्यातून शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत अशी माहिती ग्रामविकास विभागाने दिली आहे. या मोबाईल ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे काम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif)यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुक्त आयुष प्रसाद व सातारा जिल्हा परिषदेचे कार्यकारी आयुक्त विनय गौडा यांना दिले होते . त्यानुसार माहिती घेऊन ॲपच्या प्रगतीबद्दल माहिती सांगितली आहे.

ॲप असे काम करणार

या ॲपमधून बदलीच्या अर्जापासून बदलीच्या ठिकाणी नियुक्त होईपर्यंत सर्व प्रक्रिया ॲपद्वारेच पार पडणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदलीचे काम पारदर्शी होण्यास मदत होईल. तसेच बदलीची संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे 31  मी पूर्वी शिक्षकांच्या बदल्या होतात. यंदाही वेळेतच या बदल्या होणार आहेत, मात्र त्या ॲपच्या माध्यमातून पार पडणार आहे. असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सॉफ्टवेअर अपडेटचे काम सुरू

राज्यातील जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदलीचे नवीन धोरण राज्य सरकारने मागील वर्षी निश्चित केले होते. त्या अनुषंगाने नवीन अद्ययावत सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी कंपनीची नेमणूक करण्यात अली होती. त्याबरोबर एक समितीची नेमणूकदेखील करण्यात आली होती. या वर्षी त्या सॉफ्टवेअर अपडेटचे काम सुरू आहे. त्याच्यामध्ये शिक्षकांची पारदर्शक माहिती असणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Secure investment : जेवढी रिस्क तेवढा अधिक परतावा; गुंतवणुकीचा कोणता मार्ग सुरक्षीत? जाणून घ्या

Zodiac | ‘या’ राशीच्या लोकांनी सावध होण्याची गरज, प्रेमभंग होण्याची दाट शक्यता!

Khadse Patil clash: खडसेंनी पथ्य पाळावीत, चंद्रकांत पाटलांचा इशारा, MVA च्या नेत्यांच्या कृत्यामुळे जनतेची झोप उडाल्याचाही दावा

पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.