Pune Zomato boy : धारदार शस्त्रांनी डिलिव्हरी बॉयवर बालेवाडीत वार; मौल्यवान वस्तू घेऊन झाले पसार

अज्ञात (Unknown) तरुणांनी झोमॅटो (Zomato) डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. बालेवाडी रोड येथे मंगळवारी सकाळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी झोमॅटो डिलिव्हरी पार्टनरवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

Pune Zomato boy : धारदार शस्त्रांनी डिलिव्हरी बॉयवर बालेवाडीत वार; मौल्यवान वस्तू घेऊन झाले पसार
झोमॅटो Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 10:43 AM

पुणे : अज्ञात (Unknown) तरुणांनी झोमॅटो (Zomato) डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. बालेवाडी रोड येथे मंगळवारी सकाळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी झोमॅटो डिलिव्हरी पार्टनरवर धारदार शस्त्राने हल्ला केला तसेच त्याच्या मौल्यवान वस्तू लुटल्या. सौरभ गंगणे (21, रा. काळेवाडी) असे पीडित तरुणाचे नाव असून त्याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) एफआयआर दाखल केला आहे. हा प्रकार पहाटे सव्वा दोनच्या सुमारास घडला आहे. डिलिव्हरी करण्याच्या कामी सौरभ जात असताना हा हल्ला करण्यात आला आहे. यात सौरभ जखमी झाला असून त्याने थेट पोलीस ठाणे गाठत यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. बालेवाडी रोड परिसरातला हा प्रकार असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून पोबारा

या प्रकरणाचे तपास अधिकारी उपनिरीक्षक महेश भोसले यांनी सांगितले, की फिर्यादी तरूण पहाटे 2.20च्या सुमारास डिलिव्हरीसाठी बालेवाडी परिसरात गेला होता. परत येत असताना बालेवाडी रोडवरील निकम कॉलेज वसतिगृहाच्या गेट क्रमांक 2जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याला अडवले. त्यापैकी एकाने फिर्यादीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. त्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर मौल्यवान 5 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून ते फरार झाले.

तपास सुरू

पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर भारतीय दंड संहिता कलम 392, 324 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू आहे, असे भोसले यांनी सांगितले.

आणखी वाचा :

Pune Edible Oil : सावधान, खाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर कराल तर! अन्न आणि औषध प्रशासनाचा पुणेकरांना इशारा

Pune : इंधन दरवाढीचा सर्वांनाच फटका; शाळेची फी, वाहतूक अन् खाद्यपदार्थांसाठी खिसा करावा लागतोय रिकामा

पत्नीच्या आत्महत्येनंतर तिसऱ्या दिवशी पतीनेही घेतला गळफास; पाच महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.