Pune: पुणेकर जगात भारी, पीएमपीएलच्या बसमध्ये अवतरला स्पायडर मॅन, रिल्ससाठी काहीही..

पीएमपीएलच्या एका बसमध्ये लटकत असलेल्या या स्पायडर मॅनचे रिल्स सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होताना दिसते आहे. यात हा स्पायडर मॅन बसमध्ये असलेल्या हँडल्सना पकडून वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट आणि कोलांटउड्या मारताना दिसतो आहे. इतकेच काय तर दरवाजात उभे राहूनही तो स्टंटबाजी करताना पाहायला मिळतोय.

Pune: पुणेकर जगात भारी, पीएमपीएलच्या बसमध्ये अवतरला स्पायडर मॅन, रिल्ससाठी काहीही..
पुण्यात स्पायडरमॅनImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 6:25 PM

पुणे – सध्या सोशल मीडियाच्या जगात सेल्फी, रिल्स (Selfi, reels) आणि फोटो यासाठी काहीही करण्यासाठी तरुणाी उत्सुक असते. यातून अनेकदा हे प्रसंग जीवाशी बेतू शकतात, हे माहित असूनही त्यांचे या सोशल मीडियाचे (Social media)व्यसन सुटता सुटत नसल्याचे पाहायला मिळते. सेल्फीपायी यापूर्वी अनेकांनी आपले प्राण गमावल्याचा घटना आपण पाहिल्या आहेत. नदीकाठांवर, धरणांवर, डोंगरांवर सेल्फी काढताना पाय घसरुन पडून मृत्यमुमुखी पडल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मात्र तरीही सेल्फींचे प्रमाण कमी झालेले नाही. आता इन्स्टाग्रामवर रिल्स करण्याचे नवे फॅड आलेले आहे. यात निरनिराळ्या प्रकारे १५ ते ३० सेकंदांचे छोटे व्हिडीओ करण्याच्या प्रयत्नात ही नेटकरी मंडळी असतात. आता हे सगळं जगात सुरु असताना पुणे यात मागे कसं राहिलं. पुण्यात (Pune Stunt)या रिल्ससाठीच एक अनोखा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे. पुण्याच्या पीएमपीएल या स्थानिक बससेवेतील एका बसमध्ये चक्क एक स्पायडर मॅन अवतरल्याचे प्रवाशांना पाहायला मिळाले, ते पाहून त्यांना धक्काच बसला

पीएमपीएलमध्ये अवतरला स्पायडर मॅन

पीएमपीएलच्या एका बसमध्ये लटकत असलेल्या या स्पायडर मॅनचे रिल्स सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होताना दिसते आहे. यात हा स्पायडर मॅन बसमध्ये असलेल्या हँडल्सना पकडून वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट आणि कोलांटउड्या मारताना दिसतो आहे. इतकेच काय तर दरवाजात उभे राहूनही तो स्टंटबाजी करताना पाहायला मिळतोय.रिल्सच्या नावाखाली हा सगळा गोँधळ पीएमपीएलच्या बसमध्ये सुरु होता आणि त्याचे शूटिंगही करण्यात येत होते.

काय आहे या व्हिडीओत?

पीएमपीएलच्या चालत्या बसमध्ये एका तरुण स्पायडरमॅन चा वेश परिधान करुन उभा असलेला हा व्हिडिओत दिसतो आहे. त्यात तो अनोखे स्टंट करतानाही या व्हिडीओत पाहायला मिळतोय. चालत्या बस मध्ये तो चक्क लटकत होता, दारात येऊनही स्टंट देखील करत होता, हे यात पाहायला मिळते आहे. रिल्सच्या नावाखाली तरुणाने भान विसरून चालत्या बसमध्ये स्टंट केल्याचे पाहायला मिळते आहे. रिल्सच्या क्षणिक प्रसिद्धीसाठी तरुणाई काय करते आहे, असा प्रश्न या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडला नसता तरच नवल.

हे सुद्धा वाचा

रिल्स करा पण काळजी घ्या

चालत्या बसमध्ये ही सगळी स्टंटबाजी सुरु होती, तरी त्याला कुणीही रोखले नाही, हे विशेष. सुदैवाने यात काही दुर्घटना झाली नाही म्हणून हा व्हिडीओ तयार होऊ शकला. अशा रिल्स तयार करताना सावधगिरी बाळगायची गरज व्यक्त होते आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.