‘त्या’ दोन नेत्यांच्या मागणीने भाजप गोत्यात?; उमेदवारी नक्की कुणाला मिळणार?

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच दोन नेत्यांच्या मागणीमुळे भाजप गोत्यात आल्याची चर्चा आहे. कोण आहेत हे दोन नेते? त्यांची मागणी नक्की काय आहे? भाजपत नक्की काय घडतंय? वाचा सविस्तर बातमी....

'त्या' दोन नेत्यांच्या मागणीने भाजप गोत्यात?; उमेदवारी नक्की कुणाला मिळणार?
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 10:51 AM

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. अशातच प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये दोन नेत्यांच्या मागणीमुळे अडचण निर्माण झाली असल्याचं चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि नारायण राणे या दोन नेत्यांच्या भूमिकेमुळे महायुतीला गोत्यात आल्याची चर्चा आहे. एकच घरात दोघांना उमेदवारी मागितली जात असल्याने महायुतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. काँग्रस आणि राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. पण आता भाजपमध्येच एका घरातील दोन व्यक्तींकडून उमेदवारीची मागणी केली जात आहे. त्यामुळे भाजप यावर काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे.

विखे-पाटलांच्या घरात दोन तिकीटं दिली जाणार?

अहमदनगर जिल्ह्यात विखे-पाटील कुटुंबातील दोघांना उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली जात आहे. अहमदनगरमधील शिर्डी विधानसभा मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार आहेत. सातवेळा ते शिर्डीमधून निवडून आले आहेत. ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय हे लोकसभेला पराभूत झाले. त्यामुळे सुजय विखे हे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. संगमनेर या विधान मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायची आहे. माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी सुजय विखे यांनी दर्शवली आहे. पण एकाच घरात दोघांना तिकीट मिळणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

राणेंच्या घरात कुणाला उमेदवारी मिळणार?

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या घरातही दोन तिकीटांची मागणी होत आहे. राणेंची दोन्ही मुलं विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. नितेश राणे यांना कणकवलीतून तर निलेश राणे हे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. आता एकाच घरातून दोन – दोन तिकीटांची मागणी केली जात असल्याने भाजपममध्ये पेच निर्माण झाला आहे.

पर्याय काय?

एकाच घरात दोन नेत्यांना उमेदवारी दिल्यास वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं. त्यामुळे यासाठी राजकीय पर्याय शोधला जात आहे. भाजपतून तिकीटाची अडचण निर्माण झाल्यास निलेश राणे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना शिंदे गटातून निलेश राणे विधानसभा लढतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Non Stop LIVE Update
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.