रफी अहमद किडवाई यांची जयंती : स्वतंत्र भारतातील पहिल्या मंत्रीमंडळात मानाचे स्थान मिळविणारे मुस्लीम नेते
रफी अहमद किडवाई हे मुस्लीम नेते. त्यांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते. कृषीच्या क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळं त्यांच्या नावाचे पुरस्कार कृषीमध्ये संशोधन करणाऱ्यांना दिले जातात. आज किडवाई यांची जयंती त्याबद्दल...
रफी अहमद किडवाई हे भारतीय स्वतंत्रता कार्यकर्ता आणि समाजवादी (Socialist) राजनेता होते. त्यांना इस्लाम समाजवादी म्हटले जात होते. ते उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातले रहिवासी. 18 फेब्रुवारी 1894 साली त्यांचा जन्म झाला. अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयात (Aligarh Muslim University) त्यांनी शिक्षण घेतले. 24 ऑक्टोबर 1954 रोजी त्यांचा मृत्यू दिल्ली येथे वयाच्या साठाव्या वर्षी झाला. 1989 ला किडवाई यांच्यावर भारत सरकारने तिकीट प्रकाशित केले. रफी अहमद यांचा जन्म बाराबंकी जिल्ह्यातील मसौली येथे झाला. रफी यांच्यासोबत चार लहान भाऊ होते. रफी यांनी मुहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजमध्ये सहभाग घेतल्यानंतर अलीगड येथील खिलाफत आंदोलनात (Khilafat Movement) भाग घेतला. त्यानंतर राजकारणात प्रवेश केला.
स्वातंत्र्यपूर्व काळातील युपीतील वजनदान नेते
1929 मध्ये स्वराज पार्टीचे विधानसभेसाठी सचिव म्हणून रफी किडवाई यांची निवड झाली. रफी यांच्यामुळं पक्षात एकता राहण्यास मदत होत होती. मोतीलाल नेहरू यांच्याबद्दल रफी यांच्या मनात अत्यंत निष्ठा होती. 19 डिसेंबर 1929 रोजी भारतीय जनता पक्षाने पूर्ण स्वराज्याची मागणी केली. महात्मा गांधी यांनी जानेवारी 1930 ला सविनय कायदे भंगाच्या आंदोलनाची सुरुवात केली. किडवाई यांनी याच मागणीसाठी 1940 मध्ये केंद्रीय विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भारत सरकार अधिनियम 1935 पारीत करण्यात आला. किडवाई 1937 मध्ये युपीतील गोविंद वल्लभ पंत यांच्या कॅबिनेटमध्ये महसूल आणि जेलमंत्री झाले.
नेहरु यांच्या मंत्रीमंडळात सहभाग
युपीमध्ये जमीनदारी प्रणालीवर निर्बंध आणणारा प्रांत झाला. एप्रिल 1946 साली किडवाई हे उत्तरप्रदेशचे गृहमंत्री झाले. किडवाई हे जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रीमंडळात 1947 साली सहभागी झाले. किडवाई पहिले संचारमंत्री झाले. मंत्रीमंडळात किडवाई आणि अबुल कलाम आझाद हे दोन मुस्लीम होते. 1952 च्या पहिल्या निवडणुकीत किडवाई निवडूण आले. नेहरु यांनी त्यांना अन्न, कृषी विभागाचे मंत्री बनविले. कृषीच्या क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळं त्यांच्या नावाचे पुरस्कार कृषीमध्ये संशोधन करणाऱ्यांना दिले जातात. रफी अहमद किडवाई हे मुस्लीम नेते. त्यांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते. कृषीच्या क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळं त्यांच्या नावाचे पुरस्कार कृषीमध्ये संशोधन करणाऱ्यांना दिले जातात.