अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस 5 वर्ष कारावासाची शिक्षा
रायगड जिल्ह्यातील पाली पोलिस ठाणे हद्दीतील सुधागड तालुक्यात पीडित अल्पवयीन मुलीचे घरचे सर्व लोक कामधंद्यानिमित्त बाहेर गेले होते. मुलगी घरातील ओटीवर एकटीच खेळत होती. या संधीचा फायदा घेत आरोपी मोहन शिर्के याने सदर मुलीला खाऊचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. त्यानंतर घरातील सर्व दरवाजे बंद करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
रायगड : अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याप्रकरणी आरोपीला 5 वर्षे कारावास (Imprisonment) आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माणगाव विशेष सत्र न्यायालया (Mangaon Special Sessions Court)ने याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. मोहन धोंडू शिर्के असे अत्याचार करणाऱ्या आणि शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने 1 एप्रिल रोजी सात वर्षाच्या चिमुरडीवर घरी कुणी नसल्याची संधी साधत बलात्कार केला होता. याप्रकरणी पाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Accused of sexually abusing a minor girl sentenced to 5 years in prison)
खाऊचे आमिष दाखवून मुलीला घऱी नेऊन अत्याचार
रायगड जिल्ह्यातील पाली पोलिस ठाणे हद्दीतील सुधागड तालुक्यात पीडित अल्पवयीन मुलीचे घरचे सर्व लोक कामधंद्यानिमित्त बाहेर गेले होते. मुलगी घरातील ओटीवर एकटीच खेळत होती. या संधीचा फायदा घेत आरोपी मोहन शिर्के याने सदर मुलीला खाऊचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. त्यानंतर घरातील सर्व दरवाजे बंद करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही बाब पीडित मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर तिच्या घरच्यांनी पाली पोलिस ठाणे गाठत मोहन विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्कार आणि बाल संरक्षण कायद्याचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करत दोषारोप ठेवले. यानंतर माणगाव सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीला 10 हजार रुपये दंडासह 5 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास साह्ययक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी केला.
पुण्यात अशाच गुन्ह्यात आरोपीला 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
आंबेगाव तालुक्यात सात वर्षापुर्वी मजुर कामगाराच्या 10 वर्षीय पीडित मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एम अंबाळकर कोर्टाने 20 वर्ष सक्षम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ज्ञानेश्वर शंकर गुंजाळ असे शिक्षा सुनावलेल्या नराधमाचे नाव आहे. सात वर्षापुर्वी चिमकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची सुनावनी राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु होती. या दरम्यान सरकारी वकील अॅड रजनी नाईक यांनी 7 साक्षीदार तपासत असे दुष्कृत्ये कराणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा होण्याची शिफारस केली. यानुसार 16 मार्च रोजी राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली. (Accused of sexually abusing a minor girl sentenced to 5 years in prison)
इतर बातम्या
CCTV | आधी लांबून अंदाज घेतला, नंतर Activa उचलली, वसईतील धाडसी चोरी सीसीटीव्हीत कैद