भरत गोगावले यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहणार?, माजी नगराध्यक्ष ठाकरे गटात उद्या प्रवेश करणार

शिवसेनेच्या फुटीमध्ये महाडचे आमदार तथा शिंदे गटाचे पक्ष प्रमुख भरत गोगावले यांची भूमिका महत्वाची होती. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे गोगावले यांच्यासमोर कडवे अव्हान उभे करीत आहेत.

भरत गोगावले यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहणार?, माजी नगराध्यक्ष ठाकरे गटात उद्या प्रवेश करणार
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 8:33 PM

रवी खरात, प्रतिनिधी, रायगड : उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी केलेल्या आमदार भरत गोगावले यांचा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटात गेलेले आमदार भरत गोगावले यांच्या समोर उद्धव ठाकरे यांच्याकडून तगडे आवाहन दिले जाणार आहे. भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या तथा माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या उद्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये प्रवेश होणार आहे. 6 मे रोजी उध्दव ठाकरे यांची महाड मध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेत स्नेहल जगताप या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार

शिवसेनेच्या फुटीमध्ये महाडचे आमदार तथा शिंदे गटाचे पक्ष प्रमुख भरत गोगावले यांची भूमिका महत्वाची होती. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे गोगावले यांच्यासमोर कडवे अव्हान उभे करीत आहेत. महाडचे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांची कन्या आणि महाड नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा 6 मे रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होत आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक समर्थक ठाकरे गटात प्रवेश करणार

उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी महाडमधील चांदे मैदानावर सुरू आहे. ठाकरे गटाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. महाड, पोलादपूर तालुक्यातून माणिकराव जगताप यांचे अनेक समर्थक यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

निवडणुकीत उतरण्याची स्नेहल जगताप यांची तयारी

महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्नेहल जगताप यांच्या कार्यशैलीवर प्रभावित झाले. तसेच आमदार गोगावले यांच्या कार्य पध्दतीवर नाराजी व्यक्त केली. रोजगार, कारखानदारी, आरोग्य सुविधा यासाठी पुढील निवडणुकीत मैदानात उतरण्याची तयारी स्नेहल जगाताप यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे कुणाला करणार टार्गेट

उद्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत स्नेहल जगताप यांच्यासह किती कार्यकर्ते प्रवेश करतात,हे पाहावं लागेल. शिवाय उद्धव ठाकरे हे महाडच्या सभेत कुणाला लक्ष करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाने नियोजन करून ठाकरे यांची सभा जोरात घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिंदे गट वर्सेस ठाकरे गट असा सामना उद्या पाहायला मिळेल.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.