Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panvel Crime : पनवेलमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या पती-पत्नीचा रेल्वे अपघातात मृत्यू, आपटे गावावर शोककळा

जगताप जोडपे आपटा गावाती रहिवासी असून नोकरीसाठी सोमवारी सकाळी चालले होते. यासाठी ते आपटा स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या सारसईकडे जाणाऱ्या पुलावरुन ते चालले होते. यावेळी रेल्वेने त्यांना धडक दिली. या धडकेत जगताप पती-पत्नी पुलावरुन खाली नदी पात्रात पडले. यात त्यांचा मृत्यू झाला.

Panvel Crime : पनवेलमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या पती-पत्नीचा रेल्वे अपघातात मृत्यू, आपटे गावावर शोककळा
पुण्यात येरवडा कारागृहात पोक्सो गुन्ह्यातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 4:01 PM

पनवेल : कामानिमित्त जात असलेल्या पती-पत्नीचा(Husband-Wife) रेल्वे अपघातात(Railway Accident) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी पेण रेल्वे मार्गावरील रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा स्टेशनपासून काही अंतरावर घडली आहे. योगेश खंडू जगताप (31) ‌व रजनी योगेश जगताप (26) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. हे दोघेही आपटा गावातील रहिवासी आहेत. सारसईकडे जाणाऱ्या पुलावरून जात असताना त्यांना रेल्वेने धडक दिल्याने दोघे पती पत्नी नदी पात्रात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने आपटा गावावर शोककळा पसरली आहे. (Husband and wife die in train accident in Panvel)

ग्रामस्थांनी नदीतून मृतदेह बाहेर काढले

जगताप जोडपे आपटा गावाती रहिवासी असून नोकरीसाठी सोमवारी सकाळी चालले होते. यासाठी ते आपटा स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या सारसईकडे जाणाऱ्या पुलावरुन ते चालले होते. यावेळी रेल्वेने त्यांना धडक दिली. या धडकेत जगताप पती-पत्नी पुलावरुन खाली नदी पात्रात पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्याचे समजताच सामाजिक संस्थेचे अभिजीत घरत, अमित गुजरे, अरूण म्हापणकर, राजेश पारठे, भक्ती साठेलकर, गुरुनाथ साठेलकर, अमोल ठकेकर, स्थानिक ग्रामस्थ मयुर वाडेकर यांनी नदी पात्रात उतरुन दुपारी 12:30 वाजता मृतदेह बाहेर काढले.

नाशिकमध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरुन महिला पायलटचा मृत्यू

अंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्याने बाथरुममध्ये गुदमरुन एका महिला पायलटचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. रश्मी गायधनी असे मयत महिलेचे नाव आहे. गायधनी या एअर इंडियामध्ये सिनिअर पायलट होत्या. मुंबईहून नाशिकला आई-वडिलांना भेटण्यासाठी आल्या असता ही दुर्दैवी घटना घडली. ष्ठ लेखिका सुमन मुठे आणि सेवानिवृत्त वनाधिकारी मारोती मुठे यांच्या रश्मी या कन्या आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. (Husband and wife die in train accident in Panvel)

इतर बातम्या

मैत्रिणीच्या आत्महत्येमुळे डॉक्टर पत्नीनेही जीवन संपवलं? ग्रुपमधल्या इतरांनाही धक्का, नांदेडच्या आत्महत्यांचं गूढ उकलेना!

ब्रेकअपनंतरही तिला लग्न करायचं होतं, पण त्याच्या मनात…. मुंबईतील 28 वर्षीय तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.