Raigad Corona Update : महाडच्या शाळेत एका विद्यार्थ्याच्या अहवालानंतर मोठा संसर्ग, 17 जण पॉझिटिव्ह
रायगडः जिल्ह्यातील महाड तालुक्यातील विन्हेरे न्यू इंग्लिश स्कूलमधील 15 विद्यार्थी आणि 2 शिक्षकाना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. शाळेतील एका विद्यार्थ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे वर्गातील, तसेच शाळेतील इतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची अँटीजन चाचणी करण्यात आली. या चाचणीत 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. शाळेतील 238 जणांची […]
रायगडः जिल्ह्यातील महाड तालुक्यातील विन्हेरे न्यू इंग्लिश स्कूलमधील 15 विद्यार्थी आणि 2 शिक्षकाना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. शाळेतील एका विद्यार्थ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे वर्गातील, तसेच शाळेतील इतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची अँटीजन चाचणी करण्यात आली. या चाचणीत 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
शाळेतील 238 जणांची तपासणी
एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण 238 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून हा अहवाल समोर आला. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाही, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी दिली. या सर्वांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
राज्यातील ओमिक्रॉनची स्थिती काय?
राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 578 वर पोहोचली आहे. तर 259 रुग्ण ओमिक्रॉनमधून बरे झाले आहेत. सोमवारी 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात 3 जानेवारी रोजी ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले होते.
इतर बातम्या-