Irshalwadi Landslide | रात्रीचे 3.15 वाजलेले, इर्शाळवाडी दुर्घटनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती

Irshalwadi Landslide | इर्शाळवाडीत किती घर आहेत? लोकवस्ती किती आहे? सर्वप्रथम घटनास्थळी कोण पोहोचल? मदत कार्यात काय अडथळे येत आहेत? त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

Irshalwadi Landslide | रात्रीचे 3.15 वाजलेले, इर्शाळवाडी दुर्घटनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती
devendra fadnavis on Irshalgad Irshalwadi Landslide
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 12:17 PM

खालापूर : महाराष्ट्रात कालपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. या दरम्यान एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत. प्रशासनाकडून दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळावरुन मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

या दुर्देवी घटनेसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. इर्शाळवाडीत किती घर आहेत? लोकवस्ती किती आहे? सर्वप्रथम घटनास्थळी कोण पोहोचल? मदत कार्यात काय अडथळे येत आहेत? त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

रात्री 3.15 वाजता दुर्घटना स्थळावर कोण पोहोचलं?

“रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे बुधवारी रात्री भूस्खलनाची एक मोठी घटना घडली. साधारणपणे हे गाव डोंगरावर आहे. तिथे जाण्याचा रस्ता अवघड आहे. अशा ठिकाणी भूस्खलन झालं. तिथे 48 घर आहेत. त्या गावची लोकसंख्या 225 आहे. भूस्खलनाबद्दल समजल्यानंतर सर्वप्रथम तहसीलदार तिथे पोहोचले. अंधार होता. पाऊस सुरु होता. रेसक्यु ऑपरेशन सुरु करणं कठीण होतं. मुख्यमंत्र्यांनी आणि मी गिरीश महाजन यांना विनंती केली. महाजन आणि स्थानिक आमदार महेश बाल्टी लागोलाग तिथे पोहोचले. ३.१५ वाजता ते घटनास्थळावर दाखल झाले. रस्ता नसल्यामुळे एक-सव्वा तास पायी चालत जाव लागलं” असं देवेंद्र फडणवी यांनी सांगितलं.

जेसीबीचा वापर का नाही केला?

“रात्री रेसक्यु ऑपरेशन शक्य नव्हतं, तरी जेवढे लोक काढणं शक्य होतं, तो प्रयत्न सुरु झाला. तिथे जेसीबी जाणं शक्य नाहीय. त्यामुळे टीडीआरएफ, एनडीआरएफच्या टीमकडून पहाटेकडून काम सुरु आहे” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

मदत कार्यात सध्या काय अडचणी?

“गिरीश महाजन यांच्याशी मी बोललो. तिथे प्रचंड पाऊस सुरु आहे. रेसक्युकामात प्रचंड अडचणी आहेत. रात्रीपासून महाजन त्या ठिकाणी आहेत. मी, मुख्यमंत्री आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत मुख्यमंत्री पहाटे निघाले. मुख्यमंत्री रेसक्यु ऑपरेशन मॅनेज करतायत. दोन-अड़ीच टनाचा जेसीबी एअरलिफ्ट करता येईल का? याचा विचार सुरु आहे. परंतु सध्याच्या वातावरणात तिथे हेलिकॉप्टरच पोहोचणही शक्य नाहीय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “परिस्थिती कठीण आहे. उदय सामंत, दादा भुसे पोहोचले आहेत. मुख्यमंत्री सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहेत. कुठलीही कमतरता पडू नये, यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.