Rajapur Refinery Project : बारसू-सोलगावात कवडीमोल दराने जमिनीची खरेदी, परराज्यातील लोकांनी अधिक जमिनी खरेदी केल्याचं उघड
त्यामध्ये शाह, चोटाल्या, कोठारी, गुप्ता, राहिज, वांका आदी आडनावाच्या लोकांनी ही खरेदी केली आहे. तसेच राज्याचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्याला लागूनच असलेल्या रायगडमधून देखील जमिन खरेदी करण्यात आली आहे.

राजापूर – रिफानरीसाठी (Refinery) चर्चेत असलेल्या बारसू-सोलगाव आणि पंचक्रोशीमध्ये हजारो एकर जमिनीची खरेदी (Land purchase) झाली आहे. ही खरेदी जानेवारी 2022 ते मार्च 2022 या कालावधीत झाल्याची बाब आता समोर आली आहे. जानेवारी 2019 ते मार्च 2022 या कालावधीत मोठ्या प्रमाणात खरेदी जमीन राज्याबाहेरील लोकांची आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी झाली असून यामध्ये राज्याबाहेरील लोकांनी केलेली जमीन खरेदी सध्या लक्षणीय असल्याचं दिसून आलंय. राज्याबाहेरचा विचार केल्यास जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, ओडिशा, यूपी, कर्नाटकमधील (Karnataka) लोकांनी जमिन खरेदी केली आहे.
परराज्यातील लोकांनी खरेदी केल्या जमिनी
त्यामध्ये शाह, चोटाल्या, कोठारी, गुप्ता, राहिज, वांका आदी आडनावाच्या लोकांनी ही खरेदी केली आहे. तसेच राज्याचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्याला लागूनच असलेल्या रायगडमधून देखील जमिन खरेदी करण्यात आली आहे. शिवाय, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र या भागातील लोकांनी देखील याच भागात जमीन खरेदीमध्ये रस दाखवला आहे. राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे खुर्द, सोलगाव, बारसू, धोपेश्वर, गोवळ खालची वाडी, गोवळ वरची वाडी या भागात देखील ही जमिन खरेदी झाली आहे.
आठ महिन्याच्या कालावधीत जमीनी खरेदी केल्या
बारसू-सोलगावमध्ये एमआयडीसी प्रस्तावित असून त्यासंदर्भातील अधिसूचना 31 ऑक्टोबर 2019 रोजी निघाली होती. पण, त्यानंतर देखील या भागात जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरुच आहेत. यावर इथल्या काही स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. 31 ऑक्टोबर 2019 रोजी एमआयडीसीसाठी अधिसूचना निघाल्यानंतर जवळपास सहा महिन्यानंतर अर्थात 16 जून 2022 रोजी स्थानिकांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आठ महिन्यांचा कालावधी हा कुणासाठी होता? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नाणार येथे देखील रिफायनरी होणाऱ्या भागात राज्यााबाहेरील लोकांनी जमीन खरेदी केल्याची बाब समोर आली होती. त्यावेळी देखील मोठा गोंधळ झाला होता. पण, तीच गोष्ट आता रिफायनरीसाठी चर्चेत असलेल्या राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव आणि आसपासरच्या पंचक्रोशीमध्यो होताना दिसत आहे. साधारण 3 ते 5 लाख रुपये प्रति एकर दराने जागेची विक्री केली जात असल्याचं सांगितलं. शिवाय, प्रकल्प आल्यास 30 ते 40 लाख रुपये हेक्टरी दर मिळण्याच अंदाज वर्तवला जात आहे.